Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: समाज कल्याण विभागाने द्रोपदी तिवरेकर मृत घोषित केले; नातेवाईक शेखर कुट्टीकर यांनी व्यक्त केली नाराजी

Goa Today's 21 June 2025 Live Updates: गोव्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन, मान्सून, अपघात यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

समाज कल्याण विभागाने द्रोपदी तिवरेकर मृत घोषित केले नातेवाईक शेखर कुट्टीकर यांनी व्यक्त केली नाराजी

नागाळी ताळगाव येथील रहिवासी द्रोपदी तिवरेकर ज्यांना समाज कल्याण विभागाने द्रोपदी तिवरेकर मृत घोषित केले होते. नातेवाईक शेखर कुट्टीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डिसेंबर 2024 पासून त्यांना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जे 2000 खात्यामध्ये दिले जातात ते न आल्याने त्यांनी आवाज उठवला.

शेळप- खुर्द मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा

सरकारी हायस्कुल गांजे व सरकारी हायस्कुल शेळप- खुर्द मध्ये आंतरराष्ट्रीय योगादिन साजरा. मुख्याध्यापक रंजिता प्रभूसह शिक्षक व विध्यार्थ्याची योग प्रत्यक्षिके.

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि बाजार समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घेतली भेट

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि बाजार समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि ४ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली.

डिचोलीच्या अग्निशमन दलातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जवानांकडून योगा. डिचोलीच्या अग्निशमन दलातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. अधिकाऱ्यांसह जवानांकडून योग प्रात्यक्षिके.

करंझोळ सत्तरीतील लोक घेणार एफआरसींचा अधिकार

सत्तरीतील सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ गावचे लोक घेणार एफआरसीचा लाभ. एफआरसी अंतर्गत जमिनींच्या सनदी नको म्हणून आधी लोकांनी दिले होते लेखी. मात्र शनिवारी झालेल्या खास ग्रामसभेत गैरसमज दूर झाल्याने आता लोकांची एफआरसीसाठी तयारी. एफआरसीसाठीचे नोडल अधिकारी डॉ.अजय गावडे यांना गावात येऊन जागृती करण्यासंबंधी गावकऱ्यांची विनंती.

गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी योग सत्राचे नेतृत्व केले

गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राजभवनातील जुन्या दरबार हॉलमध्ये "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" या जागतिक थीम अंतर्गत ११ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग सत्राचे नेतृत्व केले. राजभवन गोव्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी राजभवन येथे योग केले.

वन हक्क संबंधित खास ग्रामसभा ठाणे डोंगुर्लि आणि नगरगाव पंचायतीतर्फे ब्रम्हकरमळी येथे संपन्न

वन हक्क संबंधित खास ग्रामसभा ठाणे डोंगुर्लि आणि नगरगाव पंचायतीतर्फे ब्रम्हकरमळी येथे संपन्न. मंजूर झालेले अर्ज आता सनदीच्या प्रतिक्षेत.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 दिवसांचे होणार

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 दिवसांचे होणार आहे. अधिवेशन जुलैच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ता. 8 ऑगस्ट रोजी संपणार आहे. अधिसूचना जारी

कुडचडेमधील व्यावसायिकाच्या कुटुंबावर पुरुषांच्या एका गटाने केला हल्ला

शुक्रवारी रात्री कुडचडेमधील एका व्यावसायिकाच्या कुटुंबावर पुरुषांच्या एका गटाने हल्ला केला. आरोपीने व्यावसायिकाच्या आठ महिन्यांच्या गर्भवती बहिणी, आई, वडील आणि धाकट्या बहिणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

International Day of Yoga: गोव्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

गोव्यात सर्वच ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेत, योग साधना केली.

विजय सरदेसाईंच्या बालेकिल्ल्यात 2027 ला कमळ फुलणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा निर्धार

भाजप २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. २०२७ ला २७ जागी विजय मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. विजय सरदेसाई यांचा बालेकिल्ला असलेल्या फातोर्डात  २०२७ ला कमळ फुलणार असा निर्धार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलून दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amba Ghat Landslide: संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत, कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

Independence Day 2025: आपल्या हाती जे ‘स्व-निर्णयाचं बळ’ आहे, त्याची ताकद स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरतरी प्रत्येकाच्या लक्षात येऊ दे

Goa Today Live News: 'पक्ष आणि राज्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, गोविंद गावडे अजूनही माझे मित्र'; प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT