Goa Rain News 
गोवा

Goa News: गोव्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, मोरजीत दोन होड्या जळून खाक; गोव्यातील ठळक बातम्या

Pramod Yadav

गोव्यात शुक्रवारी 'ऑरेंज अलर्ट', शनिवारपासून तीन दिवस 'यलो अलर्ट'

हवामान खात्याने शुक्रवारी गोव्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, शनिवारपासून तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मोरजी किनारी दोन होड्या जळून खाक, 11 लाखांचे नुकसान

विठ्ठलदासवाडा मोरजी किनारी दोन होड्यांना अज्ञात व्यक्तीकडून आग. 11 लाखांचे नुकसान. जमीन माफीयांकडून होड्या जाळण्यात आल्याचा स्थानिक मच्छीमारांचा दावा.

माझ्या नेत्यांना जे सांगायचं ते सांगितलय! विश्वजीत राणे

राजकारणात एकामेकाला फिक्स करणे थांबणे गरजेचे. मी दिल्लीत माझ्या नेत्यांना भेटून जे काही सांगायच ते सांगितलंय. मंत्री विश्वजीत राणेंचे विधान.

खनिज रॉयल्टी हा कर मानला जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

खनिज रॉयल्टी हा कर मानला जाणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रॉयल्टी हा कर असल्याचा निर्णय १९८९ साली सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता.

बाणावली किनारी प्रार्थना; पारंपरिक मच्छीमारांकडून मच्छीमार हंगामाची सुरुवात

बाणावली समुद्रकिनारी प्रार्थना करुन पारंपरिक मच्छीमारांकडून मच्छीमार हंगामाची सुरुवात करण्यात आली आहे. साठ दिवसांचा मासेमारी बंदीचा काळ संपल्यानंतर एक ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला सुरुवात होणार आहे.

पणजी, मडगाव, म्हापसा आणि वास्को बस स्थानकांचे होणार नूतनीकरण

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, पणजी, मडगाव, म्हापसा आणि वास्को बस स्थानकांचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केरी पेडणे येथे भात शेतीचे नुकसान

मोठ्या कष्टाने कसलेली भात शेती पावसाचे पाणी साचल्याने कुजून गेली. केरी पेडणे येथे पुन्हा लागवड सुरू, तर काही ठिकाणी जंगली जनावरे भात शेतीचे नुकसान करत आहेत. योग्य कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Bicholim Temple: डिचोलीत रात्रीत दोन मंदिरे फोडली

मंदिरे फोडणारी टोळी पुन्हा सक्रिय. डिचोलीत रात्री दोन मंदिरे फोडली. बाजारातील मंदिरासह पोलीस स्थानकाच्या जुन्या इमारतीजवळील श्री कोटेश्वर देवाचे मंदिर फोडले. फंडपेट्याही फोडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

Actor​ Vijay Thalapathy​: विजय थलपतीने मोडला किंग खानचा रेकॉर्ड! जाणून घ्या

ArQhive: गोव्यातील कला, इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचा अनोखा संगम 'अर्-क्वाइव्ह'

SCROLL FOR NEXT