Deepashree Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणी दीपश्रीला पुन्हा अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

26 November 2024 latest Marathi Updates: गोव्यात घडणाऱ्या ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये

Akshata Chhatre

'कॅश फॉर जॉब' प्रकरणी दीपश्रीला पुन्हा अटक!

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपश्री सावंतला फोंडा पोलिसांनी पुन्हा अटक केली.

लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

लाचखोरीच्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या आयकर विभागाच्या सीबीडीटीच्या सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांना पणजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. दोघांनाही 8 दिवस सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जमीन बळकावल्याप्रकरणी सिद्दिकीला चार दिवसांची पोलिस कोठडी!

सिद्दीकी उर्फ ​​सुलेमान खान (54, माडेल, थिविम) याला जमीन बळकावल्याप्रकरणी कोर्टाने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे!

निसर्ग हा गोव्याचा ठेवा. इथल्या स्थानिकांची शेती, बागायती, मासेमारी आणि पर्यटन हे चार मुख्य व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहेत. पुढच्या पिढीसाठी गोवा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंचे प्रतिपादन.

ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत यांना स्व. चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत यांना मानाचा स्व. चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान.

माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रधान!

माजी सरपंच श्री प्रशांत (बाळा) नाईक यांनी प्राथमिक शाळा नाईकवाडा यांना १.६० लाख रुपये किंमतीचे लाकडी बाग भेट केले आहेत.

दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवरांची भरती

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील ५ जिल्ह्यांमध्ये अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्य भरती व्हावी म्हणून जानेवारी महिन्यात रॅली आयोजित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासदार सदानंद शेट तानावडे आणि सभापती रमेश तवडकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

कुडचडे फसवणूक प्रकरणात बँक मॅनेजरला अटक

मुख्य आरोपी तन्वी वस्त हिच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आनंद जाधव याला कुडचडे पोलिसांनी कलम 409, 420 आयपीसी अंतर्गत अटक केली आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

शव प्रदर्शन सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी सरकारने मंगळवारपासून दिवाडी ते पणजीपर्यंत फेरी सेवा सुरू केली आहे. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत ही सेवा सुरु राहील.

१३ वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले १.१ कोटी

बिहारचा १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा राजस्थान रॉयल्सकडून १.१ कोटी किमतीचा IPL करार मिळवणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

परोडा खून प्रकरणात मध्य प्रदेशातील आरोपीला अटक

उबालिना ब्रागांझा (57 मोडेवाडो, परोडा) खून प्रकरणात आरोपी रामकुमार रावत (मध्य प्रदेश) याला केपे पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 28 August: जुने वाद संपतील, प्रॉपर्टी ताब्यात येईल; कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या..

TVS Orbiter: टीव्हीएस करणार मोठा धमाका! ओला-चेतकला तगडी टक्कर देण्यासाठी येतेय 'ऑर्बिटर' VIDEO

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

SCROLL FOR NEXT