गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तन्वी वस्तच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. गुरुवारी न्यायालयाने पुन्हा एकदा तन्वी वस्तला दणका दिला. न्यायालयाने तन्वीला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सांतिनेज जंक्शन ते मार्केट पर्यंतचा रस्ता बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. सध्या वाहतूक आल्तिन मार्गाने जात आहे.
6 फेब्रुवारी 2025 पासून गोवा विधानसभेचे अधिवेशन. 6 फेब्रुवारीला सकाळी 11.30 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार सुरुवात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असणाऱ्या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळणार.
जीनवगौरव श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी गोव्याचे प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक अर्मांडो कुलासो यांची निवड झाली. स्पोर्ट्स कोचिंगमध्ये हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले गोमंतकीय ठरले.
दवर्ली येथे जीप चालकाचे नियंत्रण गेल्याने कठड्याला धडक. चालकाचा मृत्यू. पोलिस तपास सुरू.
मडगाव-न्हावेली उड्डाणपुलावर चारचाकी दुचाकीला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने कोणलाही दुखापत झाली नाही.
गेल्या अर्थसंकल्पातील 446 आश्वासनांपैकी 70 आश्वासनांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. 263 आश्वासनांची कार्यवाही सुरु आहे, तर 107 आश्वासनांची कार्यवाही आम्ही मार्चनंतर करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच, 2025-26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर करण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यातील २४ खात्यांनी त्यांना दिल्या गेलेल्या बजेटमधल्या रकमेतून ३०% पेक्षा कमी खर्च केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना उर्वरित निधी वापरण्यास सांगितले.
जुन्या गोव्यात सुरु असलेल्या अवशेष प्रदर्शनाला आता मोजके दिवस बाकी आहेत. ४ जानेवारीला हा सोहळा संपणार असून त्यांनतर संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष पुन्हा बॅसिलिकात नेले जातील.
राजेंद्र आर्लेकर यांनी केरळच्या राजपालपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
नाणूस उसगांव येथे एका खाजगी मालमत्तेत सापडला मृत बिबट्या. फास लागून मृत्यू झाल्याची शक्यता.पुढील तपास सुरू.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या गाभा समितीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीत मगोसोबत युती करण्यावर झाली चर्चा. मंत्री सुदीन ढवळीकरांचीही होती उपस्थिती. मंत्री ढवळीकर भाजपसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याची सुत्रांची माहिती. ढवळीकरांकडून उपस्थित करण्यात आलेल्या काही स्थानिक राजकीय मुद्यांवरही झाली खलबते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.