Rainfall Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: येत्या दोन दिवसांत गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी आणि रविवारी (दि.20, 21 ऑगस्ट) गोव्यातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. बंगालच्या उपसागर आणि उत्तरपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.

गोव्यातील दक्षिण पश्चिम मान्सूनचा जोर ओसरला आहे, गोव्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. येत्या दोन तीन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोव्यात मध्यम स्वरूपाचा तर, काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, येत्या 23 ऑगस्ट पर्यंत कोणताही हवामान संबधित इशारा हवामान खात्याने वर्तवलेला नाही.

दरम्यान, मागील काही दिवसांत कोणकोण, म्हापसा, पेडणे, फोंडा, साखळी, वाळपोई, दाबोळी, मुरगाव, सांगे भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

SCROLL FOR NEXT