Goa lifeguards save life of Delhi tourists Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist: जीवरक्षकांनी वाचविला दिल्लीच्या पर्यटकांचा जीव

गुगल मॅपच्या आधारे पर्यटक एका जीपने धबधब्याकडे जात होते. हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतणारा होता.

दैनिक गोमन्तक

धारबांदोडा : राज्यात (Goa) सध्यातरी पूर्णपणे (Tourism) पर्यटन सुरु झालेले नाही. असे असतानाही अनेकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या दूधसागर धबधब्याकडे (Dudhsagar Waterfall) काही पर्यटक (Tourist) जात आहेत. या भागात अजूनही पावसाचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे नदी नाले दुतर्फा वाहत आहेत. रस्ते धोकायदायकच बनले असतानाही पर्यटकांनी पाण्यातून जीप काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतणारा होता. जीवरक्षकांच्या समयसूचकतेमुळे पाचही पर्यटकांचे प्राण वाचले. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दूधसागराजवळ घटना पाच पर्यटकांचा समावेश

हे पाचही पर्यटक दिल्लीचे आहेत. गुगल मॅपच्या आधारे ते एका जीपने धबधब्याकडे जात होते. पाण्यात मार्ग काढण्याच्या नादात त्यांची जीप अडकली. हे जवळच असलेल्या दृष्टीच्या जीवनरक्षकांनी पाहिले. जीवरक्षक आणि काही स्थानिक मदतीसाठी धावले त्यामुळे पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे, म्हापसाहून जीए-03-डब्ल्यू-3070 या जीपने जाणाऱ्या या पयर्टकांसोबत जीवरक्षक किंवा मार्गदर्शक नव्हता.

पर्यटकांची मस्ती

सध्या दूधसागर पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांच्या या कृतीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या पर्यटकांना कदाचित दोन ठिकाणी नदी ओलांडावी लागेल, याची जाण नसावी त्यामुळे त्यांनी जीप थेट पाण्यात उतरवली. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही जीपला थेट दूधसागर धबधब्यावर जाता येत नाही. सध्या वाहनाने धबधब्यावर जाण्यास बंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT