Goa: ‘एसओपी’तील निर्बंध मागे घेतल्याने पर्यटकांचा पूर

गोव्यातील बोट क्रूजसह हॉटेल बुकिंगमध्येही वाढ
Tourist Crowd on Cruise in Goa
Tourist Crowd on Cruise in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा सरकारने (Goa Government) पर्यटन (Tourism) आणि पर्यटकांसाठी लागू केलेली कोरोना ‘एसओपी’तील निर्बंध मागे घेतल्याने पर्यटकांचे गर्दी वाढली आहे. देशी पर्यटक एवढे दिवस गोव्यात पर्यटनासाठी कधी सीमा खुली होते, याची प्रतीक्षा करीत होते, असे पर्यटकांच्‍या वाढत्‍या लोंढ्यामुळे उघड होत आहे. गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातील समुद्रकिनारे, बोट क्रूज आणि पर्यटनस्थळांवर झालेल्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. रस्‍त्‍यावरही वाहनांची वर्दळ वाढली असून त्‍यात पिवळ्या क्रमांकाच्‍या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

उत्तर गोव्यातील कळंगुट, बागा, हणजूणे, वागातोर, मांद्रे, शिवोली, मोरजी, हरमल, तर दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, वार्का, काणकोण, आगोंद, पाळोळे, गालजीबाग किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पणजी जवळच्या मिरामार, दोनापावल येथे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असतानाही पर्यटक फिरताना दिसत आहेत. पणजीच्या अटल सेतू खालच्या बाजूला क्रूज बोटीमध्‍येही पर्यटकांची गर्दी दिसत आहे.

Tourist Crowd on Cruise in Goa
Goa Night Club...तर पुण्यातील त्या दोघांचा अपघात टळला असता!

बोट क्रूजना गर्दी

पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण असणारे बोट क्रूज सुरू झाले असून या बोटींवर गोमंतकीय लोककला सादर केल्या जातात. याशिवाय बॉलिवूड गीतांवर नृत्‍य करण्याची परवानगी दिली जाते. तिथे पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतात. पणजीतील बोट क्रूजना गर्दी होती, मात्र 50 आसनक्षमता, एसओपी उल्लंघन झालेले दिसत होते.

सावधगिरी बाळगलीच पाहिजे?

सरकारने कोविड नियमांत शिथिलता आणल्‍यावर पर्यटक मोठ्या संख्‍येने दाखल झाले आहेत. पिवळ्या क्रमांकाची वाहने, ‘रेंट अ बाईक’वरील पर्यटक सुसाट वेगाने नियमांचे उल्लंघन करत आहेत. मास्‍क, गर्दी करणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदी गोष्‍टींकडे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

Tourist Crowd on Cruise in Goa
Goa Taxi: राज्यातील 1849 डिजीटल टॅक्सी परवाने रद्द

गेल्या दोन वर्षांपासून पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पर्यटन व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. आता पर्यटन वाढत आहे, हे चांगले आहे. त्‍यामुळे संबंधित लोकांचा व्यापार वाढेल. भाजी, मासे, दुकानदार, काजू विक्रेते, टॅक्सीधारक यासह अन्‍य घटकांनाही त्याचा लाभ होईल.

- नीलेश शहा, अध्यक्ष ट्रॅव्हल अँड टुरिझम असो.

कोरोनाच्या कारणास्तव हॉटेलवर अनेक मर्यादा आल्‍या होत्या. आता पन्नास टक्के क्षमतेने पर्यटन सुरू केल्याने हॉटेल बुकिंग वाढत आहे. हॉटेल व्यवसायावर अनेक कामगार, रेस्टॉरंटधारक अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी बुकिंग वाढणे खूप गरजेचे आहे. 

- गौरीश धोंड, हॉटेल व्यवसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com