गोवा मुक्ती संग्राम... 19 डिसेंबर 1961 या दिवसाची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद आहे... भारतीय सैन्याने पोर्तुगीज सैन्याला भारतीय भूमीतून हिसकावून लावले आणि गोवा, दीव, दमण या प्रदेशातून पोर्तुगीजांची राजवट संपुष्टात आली. पोर्तुगीजांना हिसकावून लावण्यात गोव्यातील महिलांनी मोलाचे योगदान दिले आणि अशाच एक धाडसी महिला म्हणजे शारदा सावईकर. पोर्तुगीज सैन्याचा छळ सहन करूनही शारदा यांनी सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीच. पोर्तुगीजांच्या हातून गफलत झाली पण तोवर ती तरुणी बेळगावात पोहोचली होती.
'शारदा' हे नाव ऐकलं की सरस्वतीच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे शारदेचा कमळासारखा चेहरा आणि प्रसन्न भाव डोळ्यांसमोर उभा राहतो. या शारदेची कृपा कायम आपल्यावर रहावी म्हणून तिच्या सौम्य रूपाचं पूजन केलं जातं, पण शारदा ही वेळप्रसंगी शास्त्राच्या जागी शस्त्र सुद्धा घेऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शारदा सावईकर होय. डीडी सह्याद्रीच्या एका कार्यक्रमात त्यांची ही ओळख करून देण्यात आली.
फोंड्यातील सवाई या गावात शारदा यांचा जन्म ३० मार्च १९३५ रोजी झाला, गोव्याची भूमी ही मुळातच माडा-पोफळींनी समृद्ध असल्याने शारदा यांचं बालपण निसर्गरम्य परिसरात गेलं. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यात शिक्षणावर बंदी असल्याने शिक्षणासाठी शारदा सावंतवाडीला गेल्या, इयत्ता ७वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पाहिलेलं चित्र मात्र फार भयंकर होतं. परकीय सत्ता जुलूम गाजवत होती, स्थानिकांना मारझोड सुरु होती. म्हटलं तर सगळीकडे त्राहीत्राही मातली होती. आपल्या राहत्या भूमीची अशी अवस्था पाहून कुणाचंही हृदय पिळवटून जाईल एवढ्या दयनीय अवस्थेत गोवा जगात होता.
क्रांतिवीर मोहन रानडे यांच्या अंतर्गत काही बालसभा भारावल्या जायच्या, परकीय सत्ता का पळवून लावावी, आपल्या आजूबाजूला लोकं किती हालअपेष्ठा सहन करत आहेत याचे धडे गिरवले जायचे आणि याच बालसभेचा भाग असलेल्या शारदा यांच्यावर देखील रानडेंच्या शिक्षणाचा प्रभाव पडू लागला.
गोव्याबाहेरून आलेली लोकं जर का आपल्यासाठी कष्ट भोगत असलतील तर मग आपण गोमंतकीय असून का मागे फिरावं असा विचार त्या कोवळ्या मनात निर्माण झाला. शारदा सावईकर यांचे वडील पेशाने पोर्तुगीजांचे नोकर असले तरीही त्यांच्या घरात मात्र नेहमी स्वातंत्र्याच्या चर्चा रंगायच्या. काहीकाळानंतर पोर्तुगीजांनी गोव्या बाहेरील लोकांनी गोव्याची मदत करू नये म्हणून एक फतवा जारी करत सर्वांना गोवा सोडून जायला भाग पडलं आणि यामध्ये एक नाव होतं ते म्हणजे मोहन रानडे. क्रांतिवीर रानडे जरी गोवा सोडून गेले असले तरीही त्यांचं काम अबाधित ठेवण्याचं काम केलं ते शारदा सावईकर आणि सामावसकांनी.
आझाद गोमंतक दलाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला भारताचा झेंडा पोर्तुगीजांनी सर्वांसमक्ष काढला, पायाखाली तुडवून जाळून टाकला. ही गोष्ट १९५४ सालची असावी, मोंतेरो सुमारे दीडशे लोकांसोबत शारदा यांच्या घरी आला त्यांना पकडण्यासाठी. घरातील मंडळींना त्यांच्याच घरात दरारा दाखवत तो शरद खंय असा? असा ठणकावून प्रश्न विचारू लागला. यावेळीच त्याने शारदा यांच्या वाहिनीच्या केसांना पडून मागे आणून बसवल्याचा अन तिच्यावर हातात उगारल्याचा किस्सा देखील शारदा यांनी सांगितला.
मोंतेरोला गोव्यातून हिंदू साम्राज कायमचं हणून पडायचं होतं मात्र शारदा यांनी देखील न घाबरता मोंतेरोच्या नजरेला नजर दिली आणि 'मी शरद नाही शारदा आहे' असं तेवढंच खडसावून सांगितलं.अटकेनंतर शारदा यांना पणजीच्या जेलमध्ये नेऊन ठेवण्यात आलं, पाण्यासाठी सुद्धा इथे मोंतेरो थेंबाथेंबाला रडवायचा, पाणी पाजण्याऐवजी डोळ्यांसमोर ओतून हिणवायचा.
एवढ्या अतोनात हालअपेष्टा सोसून देखील त्या कोवळ्या मुलीने कुठल्याही स्वातंत्र्यसैनिकांची माहिती मोंतेरोसमोर उघड केली नव्हती. शारदा शाकाहारी आहेत जे जाणूनसुद्धा मुद्दामून त्यांसमोर मासळीचं ताट आणून ठेवलं जायचं, मात्र त्यांच्या लहानग्या वयानं कधीही पोर्तुगीजांसमोर हार मानली नाही. डोळ्यांदेखत भावाच्या छळाला त्या घाबरल्या नाही की डगमगल्या नाहीत. वेळप्रसंगी पाण्यात पाव बुडवून खात दिवस काढलेल्या त्या इवल्याश्या शारदेने कोठडीत कसे दिवस काढले असतील याची कल्पना करणं सुद्धा कठीण वाटतं.
शरद शिरवाईकर या नावाखाली पुढे २-३ वर्षांत शारदा सावईकर यांची सुटका झाली, आपल्या हातून चूक झाल्याचे पोर्तुगीजांच्या लक्षात आलेही होते. पण तोवर शारदा या बेळगावात पोहोचल्या होत्या.
मुक्ती संग्रामानंतर काहीकाळ त्यांनी शिक्षकी पेशामधून कोवळ्या मुलांना घडवलं. आजही शारदा सावईकर फोंड्यात निवास करतात, वयाच्या ९०व्या वर्षांपर्यंतच्या या प्रवासात खरोखर आयुष्याचे चढउतार पाहिलेल्या अशा स्त्रिया पहिल्या म्हणजे स्त्री ला शक्ती का म्हटलं जातं याची खात्री पटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.