Goa liberation Day

 

Dainik Gomantak

गोवा

हे महान देशभक्त कुटुंब आणि त्यांचे दोन शूर सैनिक आपल्याला आठवतात का?

1931 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनीही अशाच प्रकारचे हौतात्म्य स्वीकारले होते.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळीतल्या 1583 च्या उठावातील 15 हुतात्मे, 1787 च्या पिंटोच्या बंडातील हुतात्मे, दादा राणे अडवईकर इत्यादी हुतात्म्यांचे स्मरण आज आपण करूया. 1946bते 1961 या काळात झालेल्या गोव्याच्या आधुनिक मुक्तिलढ्यात आझाद गोमंतक दलातील अस्नोडा बार्देश येथे राहणारे बाळा राया मापारी हे पहिले हुतात्मा ठरले. 1954 साली बाळा राया मापारी यांनी आपल्या इतर साथीदारांसमवेत अस्नोडा येथील पोलिस चौकीवर हल्ला केला. या कारणास्तव त्यांना अटक करण्यात आली होती.

पोर्तुगीज अधिकारी कास्मिरो मोंतेरो यांनी त्यांचा फार छळ चालविला. परंतु बाळा राया मापारी यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सहकाऱ्यांची कोणतीही माहिती देण्यास ठाम नकार दिला. 18 फेब्रुवारी 1955 रोजी तुरूंगात चालविलेला छ्ळ सहन करत बाळा मापारी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वेळी बाळा केवळ 26 वर्षांचे होते आणि त्यांच्यासमवेत त्यांचा चुलत भाऊ रोहिदास मापारीदेखील होता. रोहिदास यानेही गोवा मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले. अस्नोडा येथील मापारी घराण्याने गोवा मुक्त करण्यासाठी मुक्तिलढ्याच्या यज्ञात आपले दोन धाडसी तरुण पुत्र अर्पण केले. हे महान देशभक्त कुटुंब आणि त्यांचे दोन शूर सैनिक आपल्याला आठवतात का?

17 डिसेंबर 1958 रोजी यशवंत आगरवाडेकर यांनी हणजुणेच्या जंगलात पोर्तुगीजांच्या (Portuguese) हाती लागण्याऐवजी आपल्या बंदुकीत शिल्लक असलेली शेवटची गोळी स्वतःवरच झाडून घेतली. यशवंत आगरवाडेकरांचे वर्णन गोव्याचे चंद्रशेखर आझाद असे केल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण 1931 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनीही अशाच प्रकारचे हौतात्म्य स्वीकारले होते.

पंजाबमधील (Punjab) 21 वर्षीय तरुण कर्नैल सिंह बेनिपाल यांनी 15 ऑगस्ट 1955 रोजी गोवा सीमेवर पत्रादेवी- तोरशें येथे आपल्या छातीवर होणारा गोळ्यांचा वर्षाव सोसत आपल्या गोव्यासाठी पराकोटीचे हौतात्म्य पत्करले होते. गोमंतकीय या नात्याने हे आपण विसरूच शकत नाही. बाळकृष्ण भोंसले हे पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले एक शूर सैनिक होते जे गोवा मुक्तीसाठी शहीद झाले.

त्यांचे सोबती अमृत चोडणकर, सोमा मळिक, रघुनाथ शिरोडकर यांनीही गोवा मुक्तीसाठी आपले अनमोल तरुण जीवन अर्पण केले. कृष्णा शेट आणि सखाराम शिरोडकर, कॅमिलो परेरा, सुरेश केरकर, बाळा देसाई, बापू गावस अशा मुक्तिलढ्यातील कित्येक वीरांना कुख्यात पोर्तुगीज अधिकारी मोंतेरो याने ठार मारले.

गोवा मुक्त करण्यासाठी तेरेखोल किल्ल्यावर सत्याग्रह करणाऱ्या हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांची त्याच ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मधुकर चौधरी, अमीरचंद गुप्ता, नित्यानंद साहा, राजाभाऊ महाकाळ, बी. हॉटेलवाला, बाबुराव थोरात, कल्याण शर्मा, एच. तमगट्टी, राम सिंग, आनंदय्या गजेंद्रगड, पन्नालाल यादव, बसवराज हुडगी आणि अशा कितीतरी भारतीयांनी गोवा मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करले. बापू सहकारी, विनायक सप्ते, परशुराम आचार्य, केशव भट टेंगसे, तुळशीदास कामत, दुलबा पवार, गंगाविष्णू भरतरे,

फटबा नाईक, इब्राहिम रमझान, काझी रामगिरी साधू, मानस गुहा, पुरुषोत्तम केरकर, सीताराम सुरी, लक्ष्मण वेलिंगकर, केदार अन्वेकर, बाबूलाल सोंधिया, अर्जुन पिरणकर, बाबला परब, नथु कांबळे, एस. के. मुखर्जी, के. व्ही. पी. पाठक, बी. शर्मा, जी. ए. जगमोहन राव, एस. आर. रमण, प्रभाकर वेरेंकर, आर. बी. निगम, दरोगा सिंह, शिवशंकर भन्साली, जगतलाल छप्राला, लाडू नाईक सावंत, कालिदास गोसावी, काशिनाथ शिरोडकर, रजनीकांत केंकरे, जगन्नाथ चोपडेकर, कृष्णा रायकर, भागुभाई पटेल, बाबुली गावस, रामचंद्र नेवगी, कृष्णा परब, मानस गुप्ता आणि इतर अनेकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली.

मनोहर पेडणेकर हे गोवा मुक्तिलढ्यात (Goa Liberation) स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शेवटचे वीर ठरले. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याच्या मुक्तीसाठी आग्वाद किल्ल्यावर शहीद झालेले मेजर एस. एस. सिद्धू, कर्नल व्ही. के. सहगल आणि दफादार मानसिंग यांनाही आपण विसरू शकत नाही.

गोवा मुक्तिलढ्यातील या सर्व धाडसी वीरांना माझा सलाम. गोवा मुक्ती लढ्यातील सर्व शूर सैनिक आणि प्राणांची आहुती देणारे हुतात्मे यांचा जय. त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक गोमंतकीयाच्या हृदयात अमर राहो. समस्त गोमंतकीय जनतेला 60 व्या गोवा मुक्तिदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय गोमंतक. जय हिंद.

प्रजल साखरदांडे

आपण गोवा (goa) मुक्तीचा हीरक महोत्सव अर्थात गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरी करत आहोत. हा एक विलक्षण आनंदाचा सोहळा आहे. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्ततेचे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, हौतात्म्य, वेळ आणि शक्ती यांचे स्मरण आजच्या दिवशी करणे फार महत्त्वाचे आहे.

गोवा मुक्तिलढ्यातील हुतात्मे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT