Goa Liberation Day Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation: षष्ठ्यब्दीपूर्तीचे कार्यक्रम ठरता ठरेनात!

गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने 300 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मुक्तीच्या (Goa Liberation) साठाव्या वर्षानिमित्त कोणते कार्यक्रम करावेत याविषयी सरकारचे (Goa Government) काही ठरता ठरेना अशी स्थिती आहे. कोविड (Covid-19)महामारी अद्याप आटोक्यात न आल्याने आणि तिसऱ्या लाटेच्या धोक्याची टांगती तलवार असल्याने आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी यासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत काही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

या बैठकीकडे विरोधकांनी तर पाठ फिरवली होती. त्यामुळे या बैठकीत काही महत्वाची चर्चा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर, आमदार चर्चिल आलेमाव, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्याचे मुख्य सचिव परीमल राय व अन्य सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. केंद्र सरकारने गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानिमित्त 300 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. त्याच्या विनियोगासाठी अनेकांचा समावेश असलेली समिती सरकारने नेमली खरी. मात्र, आता समितीच्या सदस्यांचा उत्साह मावळल्याचे दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मितीसाठी सरकार गाव व तालुका पातळीवर अनेक कार्यक्रम या माध्यमातून करण्यास इच्छूक आहे. मात्र, कोविड प्रसाराला हे कार्यक्रम कारणीभूत ठरले तर विरोधक तुटून पडतील याची कल्पनाही सरकारला आहे. त्यामुळे सरकारही जरा बेतानेच याविषयी निर्णय घेऊ पाहत आहे. आजच्या बैठकीतही त्याचेच प्रतिबिंब होते अशी माहिती मिळाली आहे.

300 कोटींचा विनियोग कसा?

गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानिमित्त केंद्र सरकारने 300 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे. त्याच्या विनियोगासाठी राज्य सरकारने समितीही नेमली आहे, परंतु यासंदर्भातील बैठकीतही कोणतीच ठोस चर्चा होत नाही. विरोधकांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्याने समिती सदस्यांचा उत्साह मावळला असून 300 कोटींचा विनियोग कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT