Leopard In Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याची झडप; मध्यरात्रीचा थरार सीसीटीव्हीत कैद

Leopard In Pedne: मधलावाडा-हरमल परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे.

Sameer Amunekar

पेडणे: मधलावाडा-हरमल परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे. काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास बिबट्यानं रहिवासी मार्सेलीन फर्नांडिस यांच्या पाळीव कुत्र्याला उचलून नेल्याची घटना समोर आलीय. या घटनेमुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री २.३९ वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं मधलावाडा-हरमल येथील रहिवासी फर्नांडिस यांच्या घरासमोरील गेटवरून थेट अंगणात उडी मारली. त्यानंतर साखळीने बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर झडप घातली व त्याला उचलून बिबट्या जंगलाच्या दिशेनं पसार झाला.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळं कुत्र्यानं मोठमोठ्यानं भुंकण्यास सुरुवात केली. कुत्र्याच्या भुंकण्यामुळं फर्नांडिस कुटुंबीय जागं झालं. त्यांनी तत्काळ बाहेर येऊन पाहणी केली, मात्र तोपर्यंत बिबट्या कुत्र्यासह गायब झाला होता.

फर्नांडिस कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, बिबट्यानं त्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला करून त्याला जंगलात नेल्याचं नेल्याचं स्पष्ट झालं.

गेल्या काही महिन्यांपासून हरमल, पेडणे भागात जंगली प्राण्यांच्या वावरामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT