Goa Wildlife
Goa Wildlife Dainik Gomantak
गोवा

Goa Wildlife: पर्यावरणीय क्षेत्र- वन्यजीव- मानव; साहचर्य राखण्याची नितांत गरज

Ganeshprasad Gogate

Goa Wildlife: गोव्यात एकीकडे व्याघ्र प्रकल्पाचा मुद्दा गाजत असून दुसरीकडे वन्यजीव मानवी वस्तीत घुसण्याच्या घटना देखील वाढत आहेत. मागील काही दिवसांत मुळगावात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं होत.

हल्लीच धारबांदोडा पंचायत क्षेत्रात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले होते. या घटनेला काही काळ गेल्यावर केपे मोरपिर्ला परिसरात दोन बिबट्यांनी दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काल शनिवारी चांदेल -हसापूर येथील कुंभारवाड्यात बिबट्याने गोठ्यातील गुरांना आपले लक्ष्य करत एका गाईच्या वासरावर हल्ला केला. त्यामुळे पुन्हा एकदा वन्यजीव विरुद्ध मानव असा संघर्ष उफाळून आलाय.

गोव्यात वाढत्या शहरीकरणामुळे बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱ्या लोकांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच अनेक गावातील अनेकांच्या घराशेजारच्या गोठ्यात शिरून पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाला अशा घटनांची माहिती दिल्यावर पिंजरे लावले जातात, मात्र ठराविक वेळीच बिबटे पिंजऱ्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.

गोव्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती, बागायती, दुग्धव्यवसाय असल्याने पशुपालन हा महत्वाचा घटक आहे. लगतच्या जंगलात शेतकरी लोक आपली गुरं चरण्यासाठी घेऊन जात असून बिबट्यांना गुरांचा माग काढणं सोपं होतं असही निरीक्षण समोर आलंय.

म्हादई अभयारण्य संरक्षित व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी जुनी आहे, तिला लोकप्रतिनिधींनी आपल्या मतपेट्या सांभाळण्याच्या कारणास्तव वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ही मागणी अजूनही अंमलात आलेली नाही.

या अभयारण्यात वाघ आहेत हे परंतु वन्य क्षेत्रात ज्या प्रकारे पर्यटनाच्या नावाखाली धिंगाणा सुरू झाला, ते पाहता वाघ आपल्या सुरक्षित जागेतून मानवी वस्तीला आले असणे अगदी स्वाभाविक आहे.

या घटनांना पूर्णविराम द्यायचा असेल तर जंगल क्षेत्र अबाधित राखणे महत्वाचे ठरणार आहे. बेसुमार जंगल तोड, डोंगर कटाई अशा विध्वंसक कृती जर वाढत राहिल्या तर तर भविष्यत अशा घटना वाढतच जातील.

वाघ आणि माणूस यांच्यातील साहचर्य राखून पर्यावरणाचा समतोल राखायचा असल्यास पर्यावरणीय क्षेत्र अबाधित राखण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT