Goa Legislative Diploma Amendment Bill Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Protest: विधानसभेबाहेरही आंदोलन! लेजिस्लेटिव डिप्लोमा दुरुस्ती विधेयकावरून गदारोळ; विरोधकांचे टीकास्त्र

Goa assembly bill controversy: राज्यातील जनतेने हे सर्व पाहिले आहे. त्यामुळे आमचा या विधेयकाला विरोध आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने चर्चा न होता ते विधेयक बहुमताने मंजूर केले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा लेजिस्लेटिव डिप्लोमा दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी विरोध करूनही ते सरकारने जबरदस्तीने मंजूर करून घेतले आहे. हे विधेयक लोकांना फसविण्यासाठी आणले आहे, असे सांगत विरोधकांनी विधानसभेसमोरील अशोक स्तंभाजवळ बसून सरकारचा निषेध केला.

गोवा लेजिस्लेटिव डिप्लोमा दुरुस्ती विधेयक महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मांडले. त्याला विरोधकांनी सुरुवातीपासून आक्षेप घेतला. ते विधेयक मंजूर केल्याने त्यावर युरी आलेमाव म्हणाले, यापूर्वी राज्यात कोमुनिदाद म्हणजे गावकरी पद्धत होती, ती मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे.

राज्यातील जनतेने हे सर्व पाहिले आहे. त्यामुळे आमचा या विधेयकाला विरोध आहे. ज्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने चर्चा न होता ते विधेयक बहुमताने मंजूर केले आहे. आमदार बोरकर म्हणाले, गावकरी पद्धतीला पोर्तुगिजांनी कोमुनिदाद नाव दिले. पुढच्या पिढीसाठी जागा राखण्याचे काम या कोमुनिदादने केले.

सरकार गोंयकारांसाठी आम्ही हे विधेयक आणत आहोत; पण मूळ गोंयकार कोण हा मूळ प्रश्न आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत, त्यासाठी हा सरकारचा प्रयत्न आहे. या विधेयकाचा फायदा बाहेरच्या लोकांना फायदा होणार आहे, आमचे घर ही मोहीम सरकार म्हणत असून, त्यात ९५ टक्के बाहेरील लोकांना भेट दिली आहे, अशी टीका त्यांनी केली.

यातून त्यांनी व्होट बँक मजबूत करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, सरकारने दादागिरी करून सरकारने हे विधेयक मांडले आहे. जनतेच्या न्यायालयात आम्ही याविषयी दाद मागू. सरकार या विधेयकाच्या मागून कोणाला लाभ मिळवून देणार आहे हे जनतेने आता लक्षात घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT