CM Pramod Sawant At Goa Monsoon Session Dainik Gomantak
गोवा

Goa News : अनुकंपा तत्त्वावर अनाथांना नोकरी देण्याचा नियम नाही : मुख्‍यमंत्री

Goa Legislative Assembly : मात्र अनाथांसाठी नोकरीत प्राधान्य देण्याबाबत नियम करण्याचा विचार करता येईल. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अशा अर्जदारांचे वय उलटून गेले असेल तर त्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक निश्‍चितपणे विचार करेल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, अनाथांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरीत प्राधान्य द्यावे असा कोणताही नियम नाही. मात्र तसा नियम करण्याविषयी सरकार विचार करेल, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिले.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्‍टा यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता. ते म्हणाले की, केपे मतदारसंघातील एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनाथ झालेल्या मुलांपैकी एकाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे वर्षभरापूर्वी सरकारने आश्‍‍वासन दिले होते. मात्र अद्याप त्याला नोकरी मिळालेली नाही. सरकार खास बाब म्हणून अशा लोकांचा विचार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी करणार आहे का?

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तसा कोणताही नियम नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठीची यादी मोठी आहे. किमान तीनशे जण प्रतीक्षेत आहेत. ‘प्रथम अर्ज केलेल्यास प्रथम’ या तत्त्वावर नोकरी दिली जाते.

मात्र अनाथांसाठी नोकरीत प्राधान्य देण्याबाबत नियम करण्याचा विचार करता येईल. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अशा अर्जदारांचे वय उलटून गेले असेल तर त्याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक निश्‍चितपणे विचार करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

SCROLL FOR NEXT