Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: विधिमंडळाविरोधात रॉड्रिग्जच्या अर्जावर 13 फेब्रुवारीला निर्णय, वाचा नक्की प्रकरण काय ?

गोवा विधिमंडळाविरोधात सचिवालयाच्या ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी त्याला मुख्य माहिती आयोगासमोर आव्हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा विधीमंडळ सचिवालयाच्या सचिव नम्रता उल्मन व जन माहिती अधिकारी (पीआयओ) मोहन गावकर यांनी माहिती हक्क कायद्याखाली मागितलेली माहिती देण्यास नकार दिल्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी त्याला मुख्य माहिती आयोगासमोर आव्हान दिले आहे.

या आव्हान अर्जावरील सुनावणी मुख्य माहिती आयुक्त विश्‍वास सतरकर यांच्यासमोर आज होऊन त्यावरील निर्णय 13 फेब्रुवारीला ठेवला आहे.

विधिमंडळ सचिवालयाने दिलेले आदेश बेकायदेशीर, विकृत, वाईट आणि कायद्याच्या विरुद्ध होते. कारण माहिती अधिकार कायद्याचा उद्देश माहिती देणे आणि ते नाकारणे नाही, अशी बाजू अर्जदार ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी मांडली, तर सरकारी वकील दीप शिरोडकर यांनी ही माहिती सादर करणे हे विधानसभेचे उल्लंघन आणि सभापतींच्या आदेशाच्या विरोधात असल्याचे सादर केले.

अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गेल्या वर्षी 28 जून रोजी ताज विवांता येथे 27आणि 28जून रोजी झालेल्या आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या फाईल नोटिंग्स आणि पत्रव्यवहाराची प्रत माहिती हक्क कायद्याखाली मागितली होती आणि कार्यक्रमावर झालेल्या खर्चाचा संपूर्ण तपशीलही मागितला होता.

मात्र ही माहिती पीआयओ तसेच अपेलेट ॲथॉरिटी असलेल्या विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी नाकारली होती. मोहन गावकर यांनी ॲड. रॉड्रिग्ज यांना माहिती हक्क कायद्याखाली दिलेल्या उत्तरात त्यांनी मागितलेली माहिती राज्य विधानसभेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल आणि गोवा विधानसभेच्या कामकाजाच्या नियमावलीच्या नियम 37(16) विरोधात असेल, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT