Internet Dainik Gomantak
गोवा

Digital Goa: इंटरनेट वापरात गोवा अव्वल! ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं; दुसऱ्या क्रमांकावर 'हे' राज्य!

Goa Leads India In Internet Usage: देशात इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. इंटरनेट वापराच्या बाबततीत गोमंतकीयही मागे नाहीत.

Manish Jadhav

Goa News: देशात इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. इंटरनेट वापराच्या बाबततीत गोमंतकीयही मागे नाहीत. ऑनलाईन बँकिंग करणे, ईमेल पाठवणे-स्वीकारणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून एखादी माहिती शोधणे यामध्ये गोमंतकीय अव्वल ठरले आहेत. होय, हे खरं आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी खात्याच्या राष्ट्रीय नुमना सर्व्हेक्षण कार्यालयाच्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एनएसएसओने राज्यातील 314 शहरी भागातील तर 639 ग्रामीण भागातील तब्बल 3645 गोमंतकीयांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या 15 वर्षांवरील महिला आणि पुरुषांचा या सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवला होता. संपूर्ण देशासह गोव्यात जुलै 2022 ते जून 2023 पर्यंत हे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सर्व्हेक्षणानुसार देशात गोवा अव्वल असून तेलंगणाने दुसरा नंबर पटकावला आहे.

सर्व्हेक्षणानुसार, राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 90.6 गोमंतकीयांना इंटरनेच्या माध्यमातून एखादी माहिती घेणे माहिती होते. तर 71 टक्के गोमंतकीयांना ईमेल कसा पाठवायचा आणि कसा स्वीकारायचा हे माहिती होते. तसेच, सुमारे 58.9 टक्के गोमंतकीयांना ऑनलाईन बँकिंग करता येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT