Goa SIR process Dainik Gomantak
गोवा

SIR प्रक्रियेत गोवा अव्वल! 11.85 लाख फॉर्मचे वितरण 4 दिवसांत पूर्ण; 10 दिवसांत 55 टक्के फॉर्म गोळा

SIR form distribution Goa: गोव्याने अवघ्या चार दिवसांत राज्यातील ११.८५ लाख गणना फॉर्म्स वितरित करण्याचा विक्रम केला.

Akshata Chhatre

SIR Campaign in Goa: मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने (ECI) सुरू केलेल्या विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR (Special Intensive Revision) प्रक्रिया मध्ये गोवा राज्याने देशात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

फॉर्म वितरणात गोव्याची विक्रमी कामगिरी

४ नोव्हेंबर २०२५ रोजी गोव्यात SIR प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेअंतर्गत, मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याने अवघ्या चार दिवसांत राज्यातील सर्व घरांमध्ये ११.८५ लाख गणना फॉर्म्स (Enumeration Forms) वितरित करण्याचा विक्रम केला.

इतक्या कमी वेळेत फॉर्मचे १००% वितरण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ४ डिसेंबर ही निवडणूक आयोगाची अंतिम तारीख असली तरीही ३० नोव्हेंबर पर्यंत राज्यात ही मोहीम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवल्याचे गोयल यांनी सांगितले.

फॉर्म संकलनातही गोवा आघाडीवर

फॉर्म वितरणासोबतच, नागरिकांनी भरलेले फॉर्म जमा करण्याच्या कामातही गोवा इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. गेल्या १० दिवसांत गोव्याने ५५.३३% फॉर्म जमा केले आहेत. फॉर्म संकलनाच्या टक्केवारीतही गोवा सध्या देशात सर्वांत जास्त आहे.

SIR प्रक्रिया म्हणजे काय?

SIR ही निवडणूक आयोगाची एक व्यापक मोहीम आहे, जी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी मतदार यादी (Electoral Roll) अचूक, समावेशक आणि अद्ययावत आहे याची खात्री करते.

याचा प्रमुख उद्देश नवीन पात्र मतदारांचा समावेश करणे, अपात्र नोंदी (जसे की मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट नोंदी) हटवणे, विद्यमान मतदारांच्या तपशिलातील चुका दुरुस्त करणे असा आहे. या मोहिमेत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन मतदारांकडून हे गणना फॉर्म्स (Enumeration Forms) संकलित करतात, ज्यामुळे मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Live News: IFFI 2025 मध्ये गोव्याची संस्कृती झळकणार; दोन गोमंतकीय चित्रपटांची Gala Premiere साठी निवड!

IND vs SA ODI Series: रोहित-विराट खेळणार, पण नेतृत्व बदलणार! वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार मोठा बदल; कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?

Fatorda Car Fire: फातोर्डा जिल्हा कोर्टाबाहेर कारला भीषण आग! गाडी जळून खाक, जीवितहानी टळली; कारण अद्याप गुलदस्त्यात

Tenant Verification Goa: उत्तर गोवा पोलिसांची मोठी मोहीम! प्रतिबंधात्मक पोलीसिंगला धार; 66 हजारांहून अधिक भाडेकरुंची पडताळणी

SCROLL FOR NEXT