Lawyers Protest in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa : पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध; वकिलांचं गुन्हा अन्वेषण शाखेसमोर धरणं आंदोलन

एका वकिलाला जबर मारहाण करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे काम त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Lawyers Protest : वकील गजानन सावंत यांना पर्वरी पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयित पोलिसांना अजूनही अटक करून निलंबित केले नाही. कारवाई करण्यासाठी वकील संघटनांकडून मदत देण्यात आली होती. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असल्याने आणखी एक दिवस देण्यात आला होता. काल सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता ही मुदत संपल्यानंतर आज 13 डिसेंबर रोजी रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण शाखेसमोर धरणे आंदोलन वकील संघटनांच्या प्रतिनिधींनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

एका वकिलाला जबर मारहाण करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे काम त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे. प्रकरण संपवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता, परंतु पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यात आणि आता चौकशी करण्यात पोलिस अकार्यक्षमपणा दाखवत आहे. वकिलांची ही गत असेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार आहे हा लाख मौलाचा प्रश्‍न आहे, अशा शब्दात वकील संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या कार्यशैलीवर निशाणा साधला होता.

पोलिसांना अटक होईपर्यंत आंदोलन

जोपर्यंत त्या संशयित पोलिस कर्मचाऱ्‍यांचे निलंबन व अटक होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे म्हापसा अ‍ॅडव्होकेट फोरमने स्पष्ट केले. सोमवारी (ता. 12) सायंकाळी म्हापशात या फोरमची बैठक झाली. या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी म्हापसा अ‍ॅडव्होकेट फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. परेश राव म्हणाले, की, उत्तर ते दक्षिण गोव्यातील सर्व फोरमने या कथित मारहाण प्रकरणातील संशयितांना अटक आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यासाठी पोलिस यंत्रणेला पुरेसा वेळ दिला. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून क्राईम ब्रँचच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन धरणार आहोत. संघटनेने आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज मंगळवारी सकाळपासूनच वकिलांनी आंदोलन सुरु केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT