Rohan Khaunte Gomantak Digital Team
गोवा

गोव्यात स्टंट, रॅश ड्रायव्हिंग भोवणार; बेशिस्त पर्यटकांसाठी सरकार करतेय नवा कायदा, खंवटे म्हणाले...

Pramod Yadav

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून होणाऱ्या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे. सरकार यासाठी नवीन कायदा करण्याच्या तयारी असून, याबाबतच्या हालचालींना वेग आल आहे.

प्रस्तावित नवीन कायद्यामुळे अशा पर्यटकांविरोधात कारवाई करण्यासाठी पर्यटन विभागाला अधिक बळ मिळेल. असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोवा पर्यटन मंडळाच्या (GTB) बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोव्यात घडणाऱ्या पर्यटकांच्या बेशिस्त घटनांना इतर विभाग देखील कारणीभूत असतात. पण, काही चूकीचे घडते त्यावेळी फक्त पर्यटन खात्याला दोष दिला जातो. त्यामुळे असे प्रकार हातळण्यासाठी नाव कायद्याची मदत होईल. असेही खंवटे म्हणाले.

गोव्यात येणारे पर्यटक भाड्याने घेतलेल्या वाहनाचा गैरवापर, चुकीचे किंवा धोकादायक पार्किंग करणे किंवा धोकादायक स्टंट किंवा रॅश ड्रायव्हिंग अशा घटनांचा समावेश आहे. तसेच, समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षकांसोबत गौरवर्तन अशा घटना देखील आहेत.

पर्यटकांमध्ये नागरी मूल्य निर्माण व्हावी आणि जबाबदारीची जाणीव व्हावी असा आमचा या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न असेल.

गेल्या दोन वर्षांत समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी वाहने घेऊन जाण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांनी केलेल्या नियमांचे उल्लंघन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अनेक पर्यटकांना दंडही ठोठावण्यात आला.

समुद्रकिनाऱ्यावर केवळ पोलीस आणि लाइफ गार्ड, दृष्टी मरीन यानांच वाहन घेऊन जाण्याची परवानगी आहे. समुद्रकिनाऱ्यावर दुचाकी वाहनांनाही बंदी आहे.

सर्वच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मग ते थायलंड, भूतान, इंडोनेशिया असो, प्रत्येक ठिकाणी काही आव्हाने आहे. परंतु आम्ही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. असे खंवटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao Fire Incident: मुळगावात आगीमुळे चार दुचाकींची राखरांगोळी! दारूच्या नशेत कृत्य केल्याचा दाट संशय

Mandovi Accident: मांडवीवरचा अपघात नशेच्या धुंदीत; लायसन्स नसताना दिली रेंटेड गाडी!!

खरी कुजबुज: रवी नाईक पुन्हा फोंड्याचे आमदार?

Goa Congress: हा कदाचित 'त्यांचा' मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो! लोबोंवर प्रदेश काँग्रेसचे आरोप

Tillari Dam: गोव्याच्या वाट्याला आणखीन पाणी येणार! 'तिळारी'ची उंची वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन

SCROLL FOR NEXT