Goa Health Study Dainik Gomantak
गोवा

Goa Health Study: कशामुळे वाढत आहेत आजार? गोवा सरकार 10 वर्षे करणार नागरिकांच्या आरोग्याचा सखोल अभ्यास

Goa Health Study: या अभ्यासात राज्यातील २५ ते ७० वर्षे वयोगटातील एक लाख नागरिकांचा समावेश केला जाणार असून त्यांच्या आरोग्याचा नियमित मागोवा घेतला जाईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील लोकांमध्ये वाढत असलेल्या विविध आजारांची कारणे शोधण्यासाठी, वृद्धत्वाचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आणि जीवनशैली व पर्यावरणाचा आरोग्यावर होणारा प्रभाव जाणून घेण्यासाठी गोवा सरकारने दहा वर्षांचा मोठा आरोग्य अभ्यास सुरू केला आहे.

या अभ्यासात राज्यातील २५ ते ७० वर्षे वयोगटातील एक लाख नागरिकांचा समावेश केला जाणार असून त्यांच्या आरोग्याचा नियमित मागोवा घेतला जाईल. या उपक्रमासाठी आरोग्य सेवा संचालनालय, टाटा मेमोरिअल सेंटर आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून गोव्यातील लोकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती गोळा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, काही आजारांचे प्रमाण का वाढत आहे, कोणते लोक त्याला अधिक बळी पडत आहेत आणि आहार, व्यायाम, राहणीमान, प्रदूषण यांसारख्या गोष्टी आरोग्यावर कसा परिणाम करतात, याचा सखोल अभ्यास या उपक्रमातून केला जाईल. त्यांनी सांगितले की, गोव्यात आजपर्यंत हाती घेण्यात आलेला हा सर्वांत मोठा आरोग्यविषयक अभ्यास आहे.

या अभ्यासातून मिळणाऱ्या माहितीद्वारे सरकारला आरोग्यविषयक योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील. तसेच आजार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि आरोग्य सुविधांचे नियोजन कसे करावे, हेही अधिक स्पष्ट होईल. दहा वर्षे चालणाऱ्या या अभ्यासामुळे गोव्यातील लोकांच्या आरोग्याचे वास्तव चित्र समोर येणार असून भविष्यातील आरोग्य धोरणे आखण्यासाठी सरकारला भक्कम आधार मिळणार आहे.

आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे, आजारांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

योग्यवेळी उपचार गरजेचे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले की, सध्या लोकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्यातील एकूण आजारांच्या भारापैकी जवळपास तीन चतुर्थांश भार अशा आजारांमुळे निर्माण होत आहे. त्यामुळे आजारांची शक्यता लवकर ओळखणे आणि योग्यवेळी उपचार व प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

SCROLL FOR NEXT