म्हापसा: बार्देश येथील जमिनीचे बनावट दस्तावेज करून जमीन हडप केल्याप्रकरणी एसआयटीने संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमानसह तिघांविरुद्ध म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र १३६४ पानी असून त्यामध्ये ४५ साक्षीदार आहेत. हे त्याच्याविरुद्धचे तिसरे आरोपपत्र असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
थिवी येथील सर्वे क्रमांक ४५५/७, ४६६/५, व ४६६/६ मधील जमिनीचे बनावट दस्तावेज तयार ककरून त्यावर सिव्हिल रजिस्ट्रार तथा सब रजिस्ट्रार कार्यालयाचा बनावट शिक्क्याचा वापर केला. याप्रकरणी या कार्यालयाचे सब रजिस्ट्रार अर्जुन शेट्ये यांनी १० जून २०२२ रोजी म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केली होती.
हे प्रकरण त्यानंतर जमीन हडप एसआयटीकडे चौकशीसाठी देण्यात आले होते. जमीन हडपप्रकरणी संशयित सुलेमानविरुद्ध आतापर्यंत एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास करून आरोपपत्रे सादर केली आहेत.
त्याने बनावट शिक्क्याचा वापर करून जमिनीचे दस्तावेज तयार केले व जमिनीचे हस्तांतरित करण्यात यश मिळवले होते. याप्रकरणी सुलेमान सह पत्नी अफसाना व आसिफ अल्लाबक्ष यांना अटक केली होती. एसआयटी म्हापसा आणि वाळपई प्रथमवर्ग न्यायालयात यापूर्वी दोन वेगवेगळी म्हापसा ८५२ पानी, तर वाळपईत ६५६ पानीचे आरोपपत्र दाखल केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.