Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

जमीन घोटाळ्यात राजकीय व्यक्ती असल्यास त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करा

युरी आलेमाव: एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: जमीन बळकावण्याच्या प्रकरणात राजकारण्यांचा सहभाग असेल तर भाजप सरकारने त्याचा राजकीय फायद्यासाठी दबावतंत्र म्हणून वापर करु नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर प्रकरणात सहभाग असलेल्या दोषींवर ताबडतोब कारवाई करावी आणि जमीन बळकाव प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

(Goa Land Scam Case If There Are Politicians, File Cases Against them - Yuri Alemao)

गोव्यातील कथित जमीन हडप प्रकरणांमध्ये राजकारण्यांच्या सहभागाबाबत पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी ठेवलेले गूढ हे भाजप सरकारच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारे आहे. सदर जमीन बळकाव प्रकरणात कोणत्याही राजकारण्याचा सहभाग असल्यास पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

भाजपच्या राजकीय फायद्यासाठी विरोधी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्यावर निवडक पद्धतीने कारवाई करण्याचे सत्र सध्या चालू आहे. या एकंदर प्रकरणात पोलीसांनी सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या दबावाखाली न येता मुक्त आणि निष्पक्ष तपास करावा. जे दोषी असतील त्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाऊ नये, असा पुनरुच्चार युरी आलेमाव यांनी केला.

गोव्यात आता उघडकीस आलेली जमीन बळकाव प्रकरणे ही भाजप सरकारचे गेल्या दहा वर्षातील प्रशासकीय अपयश आहे. सरकारच्या बेपर्वाईने राज्यात हेराफेरी आणि कागदपत्रांची बनावटगिरी वाढली आहे. आता समोर आलेल्या प्रकरणांवरून भाजप सरकार दहा वर्षांत गाढ झोपेत होते व प्रशासनावर त्यांचा कसलाच वचक नव्हता हे स्पष्ट झाले आहे. असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

जमीन बळकाव प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी तपासात पूर्ण पारदर्शकता राखली पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे हे महत्त्वाचे आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवरच कारवाई होऊ द्या. पोलिसांनी निष्पाप राजकारण्यांना किंवा सर्वसामान्यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

Goa Live News: चिखली पंचायत सिग्नलजवळ 'पॅशन प्रो' बाईकला आग; वाहतूक काही काळ विस्कळीत

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT