Suleman Khan Escaped From Jail CCTV Footage Video Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: सुलेमान खान कोठडीतून कसा पसार झाला? पाहा CCTV Footage; पोलिस हाय अलर्टवर

Suleman Khan Escaped From Jail CCTV Footage Video: सुलेमान बाहेर आल्यानंतर चपला घालून दोघेही बाहेर पडतात. पुढे दुचाकीवरुन दोघेही फरार झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Pramod Yadav

Suleman Khan Escaped From Jail CCTV Footage Video

पणजी: जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी (सुलेमान) खान गुन्हे शाखेच्या कोठीतून फरार झाला आहे. आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने सुलेमानला कोठतून बाहेर काढण्यास मदत केली. आरोपी सुलेमान आणि अमित दोघेही सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या कोठडीत असणारा सुलेमान खान याला आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने शुक्रवारी पहाटे अडिचच्या सुमारास कोठडीतून बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन फरार झाले. या संबंध घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, कॉन्स्टेबल अमित नाईक आरोपी सुलेमान खानला कोठडीतून बाहेर काढतो. सुलेमान बाहेर आल्यानंतर चपला घालून दोघेही बाहेर पडतात. पुढे दुचाकीवरुन दोघेही फरार झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोघांच्या शोधासाठी सर्व पोलिस स्थानकांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि सीमाभागातील पोलिसांना देखील सतर्क राहण्याची सूचना दिलीय.

सुलेमान खान जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. याशिवाय त्याच्याविरोधात इतर गुन्हे देखील आहेत. गेल्या ४.५ वर्षापासून तो फरार होता. सुलेमान कोठडीतून फरार होताच गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सुलेमान आणि अमित नाईक यांच्याविरोधात सक्त कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

दरम्यान, आता या घटनेवरुन राज्यात राजकारण सुरु झाले आहे. आरोपी कोठडीतून फरार होतो यावरुन कोठडीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सुलेमानला कोठडीत व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत होती. तो कोठडीच्या बाहेर खाटेवर झोपत होता. गुन्हे शाखा आणि गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

पाटकर यांच्यासह गिरिश चोडणकर यांनी देखील याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्तांना दोषी धरत राजीनामा देण्याची मागणी केली. तसेच, सुलेमानचे पलायन पूर्वीचे प्लान केले होते का? असा सवाल देखील चोडणकरांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT