ED Raid Dainik Gomantak
गोवा

ED Raid Goa: गोव्यात ‘ईडी’ची मोठी कारवाई! अनेकांचे धाबे दणाणले, 12 ठिकाणी छापेमारी

ED investigation Goa: राज्यातील जमीन बळकाव प्रकरणाशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. राज्यातील विविध भागांत १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Sameer Panditrao

शिवोली/म्हापसा: राज्यातील जमीन बळकाव प्रकरणाशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मोठी कारवाई केली. राज्यातील विविध भागांत १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. बांधकाम व्यावसायिक, पंच, रिअल इस्टेट कंपन्यांची कार्यालये व निवासस्थाने या छाप्यांमुळे हादरली. कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्‍त करण्‍यात आल्‍याचे समजते.

गेल्‍या पंधरा दिवसांतील आजची चौथी छापेमारी आहे. आज छाप्यांची सुरुवात पहाटे साडेसहा वाजता झाली. ईडीची पथके २० ते २५ वाहनांतून हणजूण, आसगाव, वाळपई भागात दाखल झाली. या कारवाईचा संदर्भ आसगाव कोमुनिदाद व हणजूण कोमुनिदाद यांच्यावतीने दाखल तक्रारींशी असल्याचे सांगितले जाते.

काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या भू-बळकाव प्रकरणातील एसआयटी तपासात संबंधितांची नावे समोर आली होती. या कारवाईत हणजूण येथील श्री भूमिका मंदिराजवळ राहणारा बांधकाम व्यावसायिक, त्याचा वाहनचालक, हणजूण-कायसूव पंचायतीचा पंचसदस्य तसेच आसगावात ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत हे छापेसत्र सुरू होते.

दरम्यान, बार्देशातील २ लाख चौरस मीटरच्या जमिनीच्या हडप प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्‍यवहारांची चौकशी करण्यासाठी ही धडक कारवाई करण्यात आली असल्याचे कळते. याच व्यावसायिकाने काही संस्थांना व व्यक्तींना मोठ्या आर्थिक स्वरूपात प्रायोजकत्व दिल्याचे समजते. या छापेमारीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

सैल यांना अटक

मंगळवारी झालेल्या छाप्यांमध्ये जमीन हडप प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची नोंदी शोधून जप्त करण्यात आल्या. दरम्‍यान, कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश सैल यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. तर, मनी लाँड्रिगप्रकरणी पप्‍पी, के. सी. वीरेंद्र यांच्‍याशी संबंधित बंगळुरु ईडी विभागाने २४ कोटींचे सोने जप्‍त केले. आत्तापर्यंत १०० कोटींपेक्षा जास्‍त रकमेची मालमत्ता जप्‍त करण्‍यात आली आहे. वरील दोन्‍ही व्‍यक्तींचे गोवा कनेक्‍शन उघड झाले आहे.

घरातील मंडळींवर अधिकाऱ्यांकडून प्रश्‍‍नांची सरबत्ती

‘ईडी’चे अधिकारी भल्‍या सकाळी अचानक बांधकाम व्यावसायिकाच्‍या घरात घुसले. त्‍यानंतर त्‍यांनी घरातील लोकांना एकत्र बसवून तपास मोहीम सुरू केली. जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्‍‍नांची सरबत्ती घरातील प्रमुख व्यक्ती तसेच इतरांवर अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी हणजूण पोलिस अधिकारी उपस्‍थित होते.

वाळपईत शिरसाट कुटुंबाची १२ तास चौकशी

वाळपईत शिरसाट यांच्‍या घरावर छापा टाकून ‘ईडी’च्‍या अधिकाऱ्यांनी १२ तास चौकशी केली. सकाळी साडेसात वाजता आलेली ही टीम रात्री आठनंतर परत गेली. हणजूण येथील ‘तो’ बिल्‍डर आणि वाळपई येथील शिरसाट यांचे कनेक्‍शन असल्‍याचा ‘ईडी’ला संशय आहे.

हणजूण, आसगाव, वाळपई भल्‍या सकाळी हादरली

२० ते २५ वाहनांतून आले अधिकारी

बिल्‍डर, पंच, उद्योजक ‘गोल्‍डन मॅन’ निशाण्‍यावर

अनेक महत्त्‍वपूर्ण कागदपत्रे जप्‍त

कोणावर केली कारवाई?

१.हणजूण येथील बांधकाम व्यावसायिक व त्याचा चालक

२.हणजूण-कायसूव पंचायतीचा पंचसदस्य

३.आसगावात ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती

४.वाळपई येथील शिरसाट आडनावाची व्‍यक्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT