Rohan Harmalkar  Dainik Gomantak
गोवा

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

ED Goa Raid: फसवणूक करुन जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल असलेल्या दोन गुन्ह्यावरुन ईडीने याप्रकरणाचा तपास सुरु केला होता.

Pramod Yadav

पणजी: गोव्यातील जमीन हडप प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत मास्टरमाईंड रोहन हरमलकरची २१२.८५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. राज्यात विविध भागतील प्राईम ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर पणजी येथील ईडीच्या विभागीय कार्यालयाने २८ जुलै रोजी ही कारवाई केली.

रोहन हरमलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात जमीन हडप, बनावट खरेदी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. ०३ जून २०२५ रोजी हरमलकरांना २००२ च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. सध्या हरमलकर न्यायालयीन कोठडीत आहेत.

फसवणूक करुन जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल असलेल्या दोन गुन्ह्यावरुन ईडीने याप्रकरणाचा तपास सुरु केला होता.

हरमलकरांनी बार्देश तालुका आणि म्हापसा शहरातील हणजूण, रिवोडा, नानोडा, कामुर्ली, पर्रा आणि आसपासच्या परिसरात असलेल्या महागड्या जमिनी फसवणूक करुन लाटल्या, असे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

यासाठी बनावट वंशावळीच्या नोंदी, बनावट विक्री कागदपत्रे, बनावट मृत्यूपत्र, फेरफार तयार केल्याचे देखील तपासातून उघड झाले आहे.

घोटाळ्यातून मिळालेला पैसा संशयितांनी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे देखील तपासात दिसून आले. ईडीने राज्यातील विविध भागातील २१२.८५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT