Goa Real Estate: गुरुग्राम नको, आता 'गोवा'च! लक्झरी व्हिलांचा आसगाव बनतंय हॉटस्पॉट; गुंतवणूकदारांना मिळतोय बंपर फायदा

Property Investment in Goa: एकेकाळी केवळ सुट्टीतील ठिकाण म्हणून ओळखला जाणारा गोवा, आता भारतातील सर्वात वेगानं वाढणारं मालमत्ता केंद्र म्हणून उदयास येऊ लागलेय.
Assagao Luxury Villas
Assagao Luxury VillasDainik Gomantak
Published on
Updated on

luxury villas in Assagao Goa: दिल्ली-एनसीआरमधील आलिशान स्थावर मालमत्तेसाठी गुरुग्रामचे नाव आघाडीवर असले, तरी आता उत्तर गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य आसगाव गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतंय . एकेकाळी केवळ सुट्टीतील ठिकाण म्हणून ओळखला जाणारा गोवा, आता भारतातील सर्वात वेगानं वाढणारं मालमत्ता केंद्र म्हणून उदयास येऊ लागलेय, आणि आसगावातील आलिशान व्हिला हे यात नवीन आकर्षण ठरतंय.

आसगावात 'लक्झरी व्हिला'ची वाढती मागणी

अलीकडे दिल्ली-एनसीआरमधील अनेक जण उत्तर गोव्यातील असागावकडे वळले आहेत. हणजूण आणि व्हागातोरसारख्या गजबजलेल्या भागांच्या जवळ असूनही, आसगावने आपली जुनी मोहिनी कायम ठेवली आहे. आधुनिक सुविधा आणि शांत वातावरणाचं मिश्रण इथे आरामदायी, सुंदर आणि विशेष जीवनशैली निर्माण करतं, ज्यामुळे निवडक खरेदीदार याकडे आकर्षित होत आहेत.

Assagao Luxury Villas
Real Estate Market: गोव्याला मागे टाकत आग्राने मारली बाजी; रिएल इस्टेट क्षेत्रात कोणत्या शहरातून मिळतोय मोठा परतावा? वाचा

मॅजिकब्रिक्सच्या अहवालानुसार, गोवा सध्या देशातील सर्वात वेगानं वाढणारं स्थावर मालमत्तेचं ठिकाण बनलं आहे, जिथे वार्षिक किमतीत सुमारे ६६.३% वाढ झाली आहे. या तुलनेत, गुरुग्राममधील मालमत्तांच्या किमती गेल्या दोन वर्षांत ६७% नी वाढल्या आहेत. मात्र, आसगावमध्ये वाढत्या मागणीच्या तुलनेत घरांची मर्यादित उपलब्धता हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी बनतेय. गोव्याच्या काही सुंदर समुद्रकिनाऱ्यांजवळील त्याचे प्रमुख स्थान आणि शांत वातावरण यामुळे आसगावला विशेष पसंती मिळत आहे.

कॉनशिएंट इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राजेश जैन यांच्या मते, "आसगाव लक्झरी व्हिलासाठी सर्वात पसंतीचे ठिकाण बनले यात आश्चर्य नाही. शहरी व्यावसायिक, कलावंत आणि तरुण उद्योजक आता फक्त लहान सुट्ट्यांसाठी नव्हे, तर सुंदर, शांत आणि खाजगी जीवनासाठी उत्सुक आहेत, आणि आसगाव त्यांना हे सर्व काही देते."

सुधारित पायाभूत सुविधा आणि रिमोट वर्कचा प्रभाव

एनरॉकच्या अहवालातून गोव्याच्या लक्झरी आणि अल्ट्रा-लक्झरी विभागात झालेल्या वेगवान वाढीवर अधिक प्रकाश टाकला आहे. पूर्वी मालमत्ता बुकिंगसाठी आठवडे किंवा महिने लागत असत, तिथे आता खरेदीदार वेगाने निर्णय घेत आहेत. सुधारित पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, थेट विमानसेवा आणि रिमोट वर्कच्या वाढत्या ट्रेंडमुळे आसगावकडे लोकांचा ओढा वाढलाय. या सर्व घटकांमुळे आसगाव केवळ एक पर्यटन स्थळ न राहता, दीर्घकालीन निवासासाठी आणि गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com