Goa Land Grab Case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grab Case: जमिन हडप प्रकरणी 12 फेरफार फाईल्स गहाळ

एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Land Grab Case: जमिन हडप प्रकरणात १२ फेरफार गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीतून समोर आली आहे. जमिनीच्या मूळ वारसदारांनी मामलेदार कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत याबाबतची माहिती मागवली होती. त्यातून ही बाब उघडकीस आली आहे.

दरम्यान, बुधवारी या प्रकरणात एसआयटीने आणखी एका आरोपीला अटक केली. अब्बासाली मकानदार (वय 37) असे या संशय़िताचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील धारवाड येथील आहे, सध्या तो फातोर्डा येथे राहतो. सासष्टीचे मामलेदार प्रतापराव पी. गावकर यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

गावकर यांच्या तक्रारीत म्हटले होते की, जानेवारी 2018 ते मे 2020 या काळात कुडतरी, राया, दवर्ली, कुंकळी, साओ जोसे डी अरोल, गौंडाळी, कोलवा आणि धर्मापूर या गावांमधील मालमत्तांसाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती.

याबाबत भोगवटादार/मालकांच्या कायदेशीर वारसांनी मामलेदार कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता 12 फेरफार फाइल्स गहाळ असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी फ्रान्सिस्को कोलाको उर्फ ​​फ्रान्सिस्को आंद्रे कोलाको, रुबी सँटेलिन फर्नांडिस, पॉलिना फालेर, आना मारिया फालेरो, सेबॅस्टियाओ फेरेरा, मारियो जोआओ फालेरो , अँजेला मॉन्टेइरो आणि जोआना फालेरो यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे सर्व दवर्लीचे रहिवासी आहेत.

आरोपींनी वारसाहक्क, विक्रीचे करार, भाडेकरू खरेदी प्रमाणपत्र, कौटुंबिक विभाजन अशी बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, साऊ जोस डी एरियल येथील अॅलेक्स फालेरो, रेजिनो फालेरो यांच्याविरोधात तसेच कुंकळी येथील डिओगो सायमन फर्नांडिस, कोलवा येथील मार्टायर्स फ्लोरिआनो कौटिन्हो, तसेच पिएडेडे डी सौझा, जोआओ अॅलेक्स रोझारियो लुईस आणि व्हॅलेरियन थॉमस अॅना पेरिन या कोलवा येथील नागरिकांविरुद्धही तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

विविध मालमत्तांच्या फॉर्म IX मध्ये त्यांची नावे समाविष्ट केली गेली आहे. डोंगरी, नावेली येथील महादेव पी. चव्हाण यांचे नावदेखील यात आहे. जमिनीच्या कागदपत्रांमधून मूळ रहिवाशांची/मालकांची नावे हटवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT