Margao Carnival Parade : मडगावमध्ये यंदा पारंपरिक मार्गानेच होणार कार्निव्हल परेड; समितीची माहिती

परेड 19 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.
Margao Carnival Parade
Margao Carnival Parade File Photo
Published on
Updated on

Carnival in Goa : कार्निव्हल हे गोव्यातील आकर्षणाचे ठिकाण आहे. फक्त कार्निव्हल बघण्यासाठी अनेकजण याकाळात गोव्यात दाखल होत असतात. 2023 च्या कार्निव्हलच्या ठिकाणानुसार तारखा जाहीर झाल्या आहेत.

Margao Carnival Parade
Online Fraud: तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 1.97 लाखांचा ऑनलाईन गंडा, पोलीस स्थानकात गुन्हा नोंद

19 फेब्रुवारीला मडगावमध्ये कार्निव्हल परेड होणार आहे. गेली अनेक वर्षे ही परेड रवींद्र भवन ते फातोर्डामार्गे होत आहे. पण याआधी परेड होली स्पिरीट चर्च ते मडगाव नगरपालिका या मार्गाने व्हायची. नंतर रहदारीच्या कारणाने हा मार्ग बदलण्यात आला. परेड मार्ग बदलल्यानंतर अनेकांनी पहिल्या जुन्याच मार्गाची मागणी केली होती.

आता अखेर पुन्हा एकदा यावर्षी जुन्या पारंपरिक मार्गानेच मडगावमध्ये परेड होणार आहे. कार्निव्हल फ्लोट मडगावमध्ये परत जुन्या मार्गावर परत आणल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे. परेड 19 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

2023 च्या ठिकाणानुसार तारखा इथे पहा:

Carnival in Goa
Carnival in GoaDainik Gomantak

तसेच 20 आणि 21 रोजी दोन प्रकारच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून यावेळी मडगाव पालिका चौकात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या सर्व 25 प्रभागात 1 खेळ तियात्रदेखील सादर होणार असल्याची माहिती दामोदर नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Education
Navelim madrasa fraud allegations
rent a car driver attack case
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com