Goa School Education संग्रहित
गोवा

Goa School Education : शालेय शिक्षण निर्देशांकात गोवा मागेच

शेजारची राज्‍ये पुढे : शिक्षणतज्ज्ञ म्हणतात, प्राथमिक शिक्षणावर भर दिला पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa School Education : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या शिक्षण कामगिरी मूल्यांकन निर्देशांक (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) अहवालात गोवा राज्याला एक हजार गुणांपैकी 783 गुण मिळाले आहेत. केरळ (901), महाराष्ट्र (869) व कर्नाटक (813) या शेजारच्या राज्यांच्या तुलनेत गोवा बराच मागे अहे. 2019-20 वर्षाचा हा अहवाल आहे.

देशातील सरकारी आणि सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर चालणाऱ्या शाळांच्या कामगिरीवरचा हा अहवाल असून गोव्यात शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या सोयीसुविधा (150 पैकी 137 गुण), शाळेत येण्याचे प्रमाण (80 पैकी 76 गुण), मुले-मुली प्रमाण समानता (230 पैकी 209 गुण) याबाबतीत गोव्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र शाळा व्यवस्थापन (360 पैकी 229 गुण) आणि शैक्षणिक गुणवत्ता (180 पैकी 132 गुण) या दोन बाबतीत गोवा बराच मागे आहे. हा अहवाल तयार करताना तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणस्तर लक्षात ठेवलेला आहे. शैक्षणिकस्तर तपासताना विद्यार्थ्यांचे भाषा व गणित विषयातील प्राविण्य लक्षात ठेवण्यात आले आहे. या बाबतीत गोवा बराच मागे आहे.

दरम्‍यान, शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी म्‍हणाले की, ज्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही त्यावेळी ते विद्यार्थी फक्त पाठांतर करतात. त्यांना ज्ञान मिळत नाही. गोव्यात हेच होतेय. येथील विद्यार्थी पास होण्यासाठी पाठांतर करतात. त्यामुळेच त्यांची भाषा आणि गणित कच्चे राहते.

गोव्यात अजूनही कित्येक सरकारी प्राथमिक शाळा एक शिक्षकी आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भाषा आणि गणित या विषयातील प्रावीण्य वाढवायचे असेल तर विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता ते स्वतः कसे शिकतील (सेल्फ लर्निंग) यावर लक्ष दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर तिंबले यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT