Krishna Janmashtami Dainik Gomantak
गोवा

Krishna Janmashtami 2023: राज्यात दहीहंडीचा जल्लोष; मंदिरे गजबजली, विविध कार्यक्रमांची रेलचेल

मुलांमध्ये आनंद: विविध शाळांमध्ये दहीहंडीचा जल्लोष

गोमन्तक डिजिटल टीम

Krishna Janmashtami 2023 राज्यात आज सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पणजीतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये वेशभूषा स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडून बक्षिसे पटकावली.

ताळगाव येथील शंकर देवस्थानात आज सायंकाळी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कीर्तन,भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संध्याकाळी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

सांतिनेज चौक,बासिलिका चौक, बॉक द वॉक, महालक्ष्मी मंदिर, हॉटेल विवांताजवळ आणि शहरातील विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. या सोहळ्यात विविध भागातील गोविंदा पथकांनी तीन चार थर रचून उंचावर लावलेली दहीहंडी फोडून घेऊन बक्षिसे पटकावली.

डिचोलीत कृष्ण जन्मोत्सव थाटात, मुलांमध्ये आनंद: विविध शाळांमध्ये दहीहंडीचा जल्लोष

दहीहंडी आदी विविध कार्यक्रमांनिशी डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राधा कृष्णची वेशभूषा करुन मुलांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद लुटत दहीहंडीही फोडली. मुलांच्या या सहभागात शिक्षक आणि पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

येथील श्री शांतादुर्गा प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत वेगवेगळा दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांनी राधाकृष्णाची वेशभूषा केली होती.

'गोविंदा, रे गोपाळा' या गीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा उत्साह साजरा केला. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागली होती. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली.

Krishna Janmashtami

मडगाव के.ब.हेडगेवार विद्यालयात गोकुळाष्टमी

दवर्ली येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दवर्ली येथील पंचायतीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास डॉ. नीलेश उसगांवकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच शाळेचे व्यवस्थापक व अध्यक्ष ब्रिजेश मणेरीकर, उपाध्यक्ष सुहास कामत, दिनेश गवंडी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनु मोडक, प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विवान रायकर, माध्यमिक विभागाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजन मांद्रेकर, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

‘सनातन धर्म स्थापित करण्यासाठी आधी आपण स्वतःच्या धर्माबद्दल जाणून घ्यावे.’ असा संदेश देत प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या लीला वर्णन करणारी नृत्ये सादर केली.

वाळपई गोशाळेत गोकुळाष्टमी उत्साहात

अखिल गोवा विश्व गोसंवर्धन केंद्र नाणूस बेतकेकरवाडा येथे गोशाळेत आज गोकुळाष्टमी निमित्त गोकुळ काला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाळपई येथील डाॅ. केशव बळीराम हेडगेवार शाळेतील मुले उपस्थित होती. यावेळी मुलांनी राधाकृष्णाचा वेश परिधान केला होता.

सुरुवातील मुलांनी विविध श्रीकृष्णाचे गीत, नृत्य, कथा सादर केल्या.यावेळी व्यासपिठावर प्रमुख वक्त्या शिक्षिका गीता गाडगीळ, गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब, खजिनदार लक्ष्मण जोशी, डाॅ. हेडगेवार हायस्कूलच्या व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष डाॅ. अशोक आमशेकर, सचिव प्रकाश गाडगीळ, मुख्याध्यापिका निलांगी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

वाळपई गोशाळा गेली १४ वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करून गोसेवेबरोबर समाज हित जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,असे हनुमंंत परब यांनी सांगितले.

डाॅ. अशोक आमशेकर म्हणाले, आज गोपाळ काला गोसंवर्धन केंद्रात साजरा करुन मुलांना गाईंच्या सानिध्यात राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. गोसेवा केल्यानंतर आपल्याला काही प्रमाणात मदत होईल.

गोशाळा पदाधिकाऱ्यांनी मंदिरात गोमातेची तसेच गाईंची पूजा करुन त्यांना भोजन दिले. तसेच गोपाळांनी वासरांची पूजा केला. यावेळी अनेकांनी सप्तगोमाता मंदिराला भेट दिली.

यावेळी मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यानंतर मुलांचा दहीहंडी फोड कार्यक्रम झाला. यावेळी हजारो गोप्रेमी, पालक व भक्त उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electric Buses: 'पीएम ई-बस सेवा' योजनेतून गोव्याला मिळणार 200 आधुनिक बसेस, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फायदा

Kala Academy Award Controversy: कला अकादमी सॉफ्ट टार्गेट! युगांक नायक यांच्या आक्षेपामुळे पुरस्कारावरुन वादंग; नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये बदलाची गरज

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT