Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: महिलांच्या सतर्कतेने मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला; कोरगाव पेठेतील घटनेमुळे खळबळ

Goa Theft Case: हळदी कुंकू समारंभासाठी 3-4 महिलांचा ग्रुप जात असताना घडली घटना

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case: कोरगाव पेठेचा वाडा या मुख्य रस्त्यावर चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्न केलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकाराने महिलावर्गात दहशत निर्माण झाली आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार कोरगाव पेठेचा वाडा या मुख्य रस्त्यावरून हळदी कुंकू समारंभासाठी 3-4 महिलांचा ग्रुप जात असताना त्यांच्या पाठीमागून चालत आलेल्या दोघा चोरट्यांनी त्या ग्रुपमधील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मात्र त्या महिलेने आणि सोबतच्या अन्य महिलांनी चोरट्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला.

या झालेल्या झटापटीत मंगळसूत्र तुटून रस्त्यावर पडले. चोरीचा ऐवज हाती येत नाही हे पाहून त्या चोरट्यांनी तिथून पळ काढला. याचवेळी मागाहून येणाऱ्या अन्य महिलांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला.

घटनास्थळी त्या चोरट्यांचे चप्पलआणि मोबाईल सापडला असून एकाने हिरव्या रंगाचा शर्ट तर एकाने टीशर्ट घातला असल्याची माहिती त्या महिलांनी दिली आहे.

ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून घटनेनंतर या वाटेने जाणाऱ्यांची घटनास्थळी गर्दी जमा झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT