Prakash Paryekar Dainik Gomantak
गोवा

Goa Konkani Academy: प्रकाश पर्येंकर यांच्‍या ‘वर्सल’ कथा संग्रहाला साहित्‍य अकादमीचा पुरस्‍कार

Goa Konkani Academy: धगधगते ग्रामीण जीवन : वेगवेगळ्‍या वंचित समाजाच्‍या जीवनाचे विदारक चित्रण

सुशांत कुंकळयेकर

Goa Konkani Academy: गोव्‍यातील अस्‍सल ग्रामीण जीवन आणि ग्रामीण भागातील वंचित समाजाच्‍या व्‍यथांना ताेंड फाेडणारे साहित्‍यीक म्‍हणून मान्‍यता पावलेले डॉ. प्रकाश पर्येकर यांच्‍या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला यंदाचा केंद्रीय साहित्‍य अकादमीचा कोंकणी विभागातील पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. हा पुरस्‍कार म्‍हणजे, कोंकणी ग्रामीण साहित्‍याचा गौरव अशी प्रतिक्रिया डॉ. पर्येकर यांनी व्‍यक्‍त केली आहे.

डॉ. पर्येकर यांची ओळख ग्रामीण भागातील भळभळत्‍या व्‍यथा प्रभावीपणे साहित्‍यात आणणारे साहित्‍यीक अशी असून यंदा त्‍यांच्‍या ज्‍या ‘वर्सल’ या पुस्‍तकाला हा पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे त्‍यातही धनगर, वानरमारे, आदिवासी या अशा समाजाच्‍या व्‍यथा प्रभावीपणे कथातून पुढे आणल्‍या आहेत.

एक लाख रुपये रोख आणि मानपत्र अशा स्‍वरुपात हा पुरस्‍कार दिला जात आहे. यापूर्वी प्रकाश पर्येकर यांना साहित्‍य अकादमीच्‍या बाल साहित्‍य पुरस्‍कारानेही गौरविण्‍यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT