Kokum production Dainik Gomantak
गोवा

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

kokum production decline bicholim goa 2026: पावसाळ्याची चाहूल लागल्याने डिचोलीत सध्या गावोगावी ‘कोकम’पासून ‘आमसुले’ (सोले) करण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: पावसाळ्याची चाहूल लागल्याने डिचोलीत सध्या गावोगावी ‘कोकम’पासून ‘आमसुले’ (सोले) करण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेषकरून महिलावर्ग आमसुले करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘कोकम’चे पीक समाधानकारक आहे. अवकाळी पावसामुळे गेल्यावर्षी जवळपास ४० टक्के पीक वाया गेले होते.

‘आमसुलां’प्रमाणेच कोकमपासून मिळणारा रस अर्थातच ‘आगळा’लाही बाजारात मागणी आहे. डिचोली तालुक्यातील कुडचिरे, म्हावळींगे, कासारपाल, उसप, लाटंबार्से, कारापूर, मये, धुमासे, साळ आदी बहुतेक भागात काजू पिकानंतर ‘कोकम’चा व्यवसाय परंपरागत चालत आहे. सध्या गावोगावी ‘कोकम’ व्यावसायाची लगबग सुरू आहे.

महिलावर्ग रात्रंदिवस मेहनत करून आमसुले तयार करताना दिसून येत आहे. यंदा ‘कोकम’ पीक समाधानकारक आले असले, तरी पिकलेली कोकमची फळे झाडावरून काढून त्याच्यावर प्रक्रिया करून आमसुले तयार होईपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट आणि येणारा खर्च पाहता यंदाही आमसुले ‘आंबट’च होणार असल्याचे स्पष्ट आहे.

तसे संकेतही ‘कोकम’ बागायतदार आणि विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. सध्या यंदाच्या मोसमातील ‘आमसुले’ ही बाजारात दाखल झाली आहेत.

मजुरांचा खर्च परवडेना!

झाडावरील ‘कोकम’ची फळे काढण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळालेच तर ते भाव खातात. या व्यावसायामागे येणारा खर्च त्यातच ही फळे स्वच्छ करून ती फोडून आमसुले तयार करीपर्यंत मोठी मेहनत करावी लागते. त्यामुळे ही ‘आमसुले’ कमी दरात विकली, तर खर्च आणि मेहनत याचा ताळमेळ बसत नाही. पावसावर ‘आमसुलां’च्या दरातील चढउतार ठरणार आहे, असे पूजा गावडे आणि मंजुळा ठाकरकर या गृहिणींनी सांगितले.

महाग असूनही मागणी!

यंदा हंगामातील ५० टक्के आमसुले तयार झाली असून, ती बाजारात दाखल झाली आहेत. दैनंदिन जेवणातील एक घटक असलेल्या आणि ‘हुमणा’ची लज्जत वाढवणाऱ्या कोकमच्या आमसुलांना प्रचंड मागणी असते. मात्र, २५० ते ३०० रुपये पड तर एक हजार रुपये पायली, असे आमसुलांचे दर आहेत. दुसऱ्याबाजूने कोकमच्या ‘आगळा’लाही भाव आला आहे. महाग असली, तरी आहारातील घटक असल्याने आमसुलांना बाजारात मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT