Goa Kidnapping News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : अपहरणाचा प्रकार, की कल्पनाविलास? पोलिस संभ्रमात

म्हापशात एनजीओंच्या उपस्थितीत ‘त्या’ मुलीशी संवाद

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येथील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीचा अपहरणाचा कथित प्रयत्न गुरुवारी दुपारी झाल्याचा दावा पीडितेच्या पालकांनी केला होता. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तपास सुरू असून, शुक्रवारी (ता.30) एनजीओंच्या उपस्थितीत पोलिसांनी या मुलीशी संवाद साधला. शिवाय, हा प्रकार कल्पनाविलास असू शकतो का? यादृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत म्हापसा पोलिसांनी कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांना शाळेच्या आवारातील अन्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा परिसरात अशी अज्ञात बुरखाधारी महिला कुणीही पाहिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूने, हा पीडित मुलीचा कल्पनाविलास तर नाही ना, अशा दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अलीकडे लहान मुले चित्रपट व मालिका पाहातात. त्यामुळे काहीवेळा यातील प्रसंग मनावर बिंबतात आणि तेच सत्य असल्याचे मानले जाते.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालकांनी पाल्यांना फॅमिली कोड द्यावा, जेणेकरून कुणीही त्यांना शाळेतून नेण्याच्या बहाण्याने आल्यास हा कोड त्यावेळी महत्त्वाचा ठरेल, असे मुलीच्या पालकांचे म्हणणे आहे.

ओळख उघड होण्याचा धोका

पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाविषयी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी अहवाल बनवला आहे. मात्र, या अहवालाची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामधून आमची तसेच मुलीची ओळख उघड होत आहे. त्यामुळे लोकांनी ही प्रत व्हायरल करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रवेशद्वारावरील कॅमेरा बंद

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पण नेमका प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त असून इतर सर्व कॅमेरे सुरू आहेत. याशिवाय शाळेच्या परिसरात चौकशी केली. मात्र, त्यावेळी अशी बुरखाधारी महिला परिसरात कुणी पाहिली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

म्हापशातील अपहरण प्रकरणाविषयी मी मुख्यमंत्री तसेच पोलिसांसोबत चर्चा केली. या प्रकाराविषयी सत्यता पडताळण्याची सूचना तपास यंत्रणेला केली आहे. पणजीत ज्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, त्याच धर्तीवर म्हापशातही लावण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

- जोशुआ डिसोझा, उपसभापती.

म्हापशातही एकास अकारण मारहाण!

शुक्रवारी म्हापसा येथील एका कॉलेजच्या वाहनतळावर एक युवक फुटबॉल सामना पाहात होता. युवक हा मार्शल आर्टचे क्लास घेतो. मात्र, काहींनी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तो अपहरणकर्ता आहे, असा संदेश पाठवला. तो संदेश पाहून पालक घाबरले. यातील काही पालकांनी कॉलेजच्या आवारातच या युवकास पकडून मारझोड करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT