khazan Land Regularisation Dainik Gomantak
गोवा

Goa khazan Land Regularisation: आता खाजन जमिनीतील बांधकामे होणार नियमित, 2011 अधिसूचनेपूर्वीची बांधकामे कायदेशीर

khazan Land Regularisation: सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा बृहद आराखडा अंतिम केल्याने आणि त्याआधारे नवीन किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलीय.

Sameer Amunekar

पणजी: सरकारी जमीन, कोमुनिदादची जमीन यांच्या पाठोपाठ आता खाजन जमिनीतील बांधकामे नियमित होणार आहेत. सागरी अधिनियम अधिसूचना २०११ जारी होण्यापूर्वी खाजन जमिनीत असलेली बांधकामे बेकायदा म्हणता येणार नाहीत, अशी भूमिका गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतली आहे.

ही अधिसूचना २०२२ मध्ये कायम करण्यात आली आहे. गोवा सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा बृहद आराखडा अंतिम केल्याने आणि त्याआधारे नवीन किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने, २०११ पूर्वी खाजन शेतीसह किनारी भागात झालेल्या बांधकामांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१६ चे सुधारित नकाशे मान्य करून ते २०१९ च्या सागरी अधिनियम अधिसूचनेशी सुसंगत केले आहेत. यामुळे उच्च भरती रेषेजवळील विकासावर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवता येणार आहे.

‘त्या’ बांधकामांना होणार नाही दंड

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने स्पष्टिकरणात सांगितले की, २०११ च्या अधिसूचनेपूर्वी खाजन शेती व इतर किनारी जमिनीत झालेली बांधकामे, जरी ती नंतर ‘जैव संवेदनशील’ क्षेत्र म्हणून घोषित झाली असली तरी, त्यांच्यावर मागील कालावधीचा दंड लागू होणार नाही. या निर्णयामुळे खाजन शेतीतील बांधकामधारकांना दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT