Kalasa Banduri Project Dainik Gomantak
गोवा

Kalasa Banduri Project: कळसा भांडुरा प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश; सिद्धरामय्या यांची कर्नाटक विधानसभेत खंत

Kalasa Banduri Project: मात्र, हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्धार ठाम - सिद्धरामय्या

गोमन्तक डिजिटल टीम

Kalasa Banduri Project: म्हादई (मांडवी) नदीचे पाणी कर्नाटकातील मलप्रभा नदीपात्रात वळविण्यासाठी निविदा काढण्याची सर्व तयारी कर्नाटक सरकारने केली होती.

मात्र, या कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी देण्याबाबत निर्णय लांबणीवर टाकल्याने हा प्रकल्प तडीस लावता आला नाही, अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू येथील विधानसभेत २०२४-२५ सालचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केली.

मात्र, हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्धार ठाम असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. त्यांनी विधानसभेत सांगितले, की कळसा-भांडुरा नाला वळण प्रकल्पांतर्गत ३.९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापरण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी दिली.

कर्नाटक सरकारने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून वन मंजुरीच्या अपेक्षेने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाचा वन मंजुरीसंदर्भातील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT