Kala Academy Slab Collapsed Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Slab Collapsed: दुर्घटनेचे कारण समजले मात्र जबाबदार कोण याचा खुलासा नाहीच..

आयआयटी अहवाल : सभागृहाचा स्लॅब सळ्या गंजल्यामुळे कोसळला

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Slab Collapsed कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा स्लॅब सळ्या गंजल्यामुळे कोसळला, याची पृष्टी करणारे २४७ पानांचे एकूण चार अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेच्या पटलावर ठेवले खरे; परंतु याला जबाबदार कोण, याचा काहीच खुलासा त्यांनी न केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कला अकादमी वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना हा स्लॅब कोसळल्याने याविषयी विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

यावर विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या मुख्य सचिवांनी १७ जुलै रोजीच आयआयटी रूरकीकडून याविषयी अहवाल करून घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.

कंत्राटदाराला आयआयटी मुंबईकडून अहवाल करून घेण्यास सांगितले होते. राज्याचे प्रधान मुख्य अभियंता, आयआयटी मुंबई आणि यानंतर आयआयटी दिल्ली यांनी दिलेल्या अहवालात हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्या आणि स्लॅब कोसळला, असे कारण दिले आहे.

तत्पूर्वी विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले, १७ जुलै रोजी स्लॅब कोसळला, याची माहिती सर्वांनाच आहे.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, जेम इन्जेर्सेव प्रा. लि. आणि मद्रास आयआयटीकडून कला अकादमी संकुल पाडण्याची गरज नाही, असे अहवाल मिळाले होते.

स्लॅब कोसळल्यानंतर सरकारने तातडीने त्याची कारणमीमांसा करण्याचे ठरवले. रुरकी किंवा अन्य आयआयटी वा एनआयटीकडून स्लॅब पडण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आदेश जारी केले.

त्यानुसार कंत्राटदाराला आयआयटी मुंबईकडून अहवाल घेण्याची सूचना केली आणि रुरकी आयआयटीलाही विनंती केली.

‘त्या’ प्रश्‍नाला मोघम उत्तर

कला अकादमीच्या वास्तूचे नूतनीकरण करताना हा भाग पाडण्याची गरज नव्हती, असे तीन स्वतंत्र यंत्रणांचे अहवाल होते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

पाहणी करण्यास आलेले लोक मुख्यमंत्र्यांना भेटले होते का, अशी विचारणा यानिमित्ताने आमदार विजय सरदेसाई यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी पाहणी पथकाने त्यांचे काम केले, असे मोघम उत्तर दिले.

‘रुरकी’कडून प्रतिसाद नाही

रुरकी आयआयटीशी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने दिल्ली आयआयटीला विनंती केली, ती त्यांनी मान्य केली.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता, मे. रायटस् लिमिटेड आणि आयआयटी मुंबईकडून अहवाल मिळाले.

तसेच दिल्ली आयआयटीकडूनही अहवाल मिळाला आहे. कला अकादमी संकुल ४३ वर्षे जुने आहे. स्थापत्यविशारद चार्ल्स कुरैय्या यांनी त्याचा आराखडा तयार केला होता.

खुले सभागृह हे संकुलातीलच; पण स्वतंत्र बांधकाम होते. ते सळ्या गंजल्यामुळे कोसळले, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT