Kala Academy, Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: कला अकादमीसाठी तियात्रिस्तही आक्रमक! राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार

Kala Academy Issue: कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते

गोमन्तक डिजिटल टीम

डॉ. प्रमोद सावंत सरकार हे कला आणि कलाकारांच्या विरोधी आहे. फक्त इव्हेंटचा मलिदा खाणाऱ्या या सरकारचे कलाकारांशी काहीच देणे-घेणे नाही. या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता कलाकारांनीच पुढाकार घ्यावा. कला अकादमीच्या निनित्ताने सुरू झालेले हे आंदोलन आता राज्यव्यापी करण्याचा निर्धार आज मडगावातील सभेत व्यक्त करण्यात आला.

कलाराखण मांड या नावाने आयोजिलेल्या आजच्या या सभेला विविध क्षेत्रांतील कलाकार आणि कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या आंदोलनापासून तियात्र कलाकार अलीप्त राहिले होते; पण आजच्या या सभेला उपस्थित असलेल्या तियात्रिस्तांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हा प्रश्न विधानसभेच्या पटलावर आणून आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता, ‘आप’चे आमदार क्रुझ सिल्वा हेही उपस्थित होते.  

यावेळी कला अकादमीच्या बांधकामात वेळोवेळी कसा घोळ झाला,  याचे सादरीकरण  ‘द चार्लस कुर्रैया फाऊंडेशन’तर्फे तन्वी कारिया यांनी सादर केले.  ही सभा व सादरीकरण आज मडगावात गोमंत विद्या निकेतनच्या ॲम्फी थिएटरमध्ये झाले.  कला अकादमीचे नूतनीकरण करताना कलाकारांना विश्वासात घेतलेच नाही आणि तिथेच सगळे चुकले, असा आरोप करण्यात आला.

तियात्र पाहण्यासाठी येतात साप

यावेळी प्रसिद्ध तियात्रिस्त रोझफर्न यांनी आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला असेल असे वचन दिले, तर फ्रान्सिस द तुये यांनी आपल्या राजकीय कांतारातून सरकारचे वाभाडे काढताना आता सरकारी थिएटरमध्ये तियात्र पाहण्यासाठी सापही येऊ लागले आहेत, अशी कोपरखळी हाणली.

हस्तक्षेप याचिका दाखल करा!

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, कला अकादमीप्रश्र्नी  न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय  दुसरा पर्याय नाही. मी याप्रकरणी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता राज्यातील कलाकारांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून स्वतः त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT