kajareghat Waterfalls  Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfalls : सेल्फी काढण्याच्या नादात दोघे बुडाले

काजरेघाट सत्तरी धबधब्यावरील घटना : 18 वर्षीय युवकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त

दैनिक गोमन्तक

वाळपई : सावर्डे सत्तरीतील कोणीर काजरेघाट धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या वास्को येथील दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. शशी साेमनल (18) आणि गाैरव रणधीर सिंग (18 दाेघे रा. शांतादुर्गा मंदिर, सांकवाळ) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्कोतील आठ जण सहलीसाठी कोणीर धबधब्यावर येथे आले. अती पावसामुळे येथील पाण्याचा प्रवाह जोरात सुरू आहे. यावेळी शशी आणि गौरव हे दोघे सेल्फी फोटो काढत होते. या दरम्यान एकाचा पाय घसरला त्याला हात देत असताना दुसराही वाहुन गेला.

वाळपई पाेलीस बरोबर वाळपई अग्निशामक दलाच्या जवांनानी घटनेच्या ठिकाणी जाऊन शाेधकार्य सुरू केले. चार तासांच्या शाेधकार्यानंतर शशी साेमनल यांचा मृतदेह सापडला. पण गाैरवचा मृतदेह सापडला नाही. काळाेख असल्याने शाेधकार्यात अडथळा आल्याने रात्री साडेनऊ वाजता शाेधकार्य बंद केले. सकाळी परत शाेधकार्य सुरू केले जाईल असे पाेलीस उपनिरीक्षक गड्डी यांनी सांगितले.

धबधब्यावर येणाऱ्यांना बंदी घाला

सत्तरीत धबधब्यावर अनेक पर्यटक येत असतात. पण काही जण दारू पिऊन धांगडधिंगा घालत असतात. सतत पडत असलेल्या पावसामुळे धबधब्यावर पाण्याचा प्रवाह जाेरात असून त्यामुळे बाहेरील पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे जीव गमवावा लागत आहे. पुन्हा अशा प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून धबधब्यावर येणाऱ्यांना बंदी घालावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

साेशल मीडियावर पाहून वास्कोतील तरुणांनी या धबधब्याची सहलीसाठी निवड केली होती. धाेकादायक ठिकाणी जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकण्याच्या मोहापायी दोघांनी आपला जीव गमावला. शशी साेमनल हा एमएएस काॅलेजमध्ये तेरावीच्या वर्गात शिकत होता. तर गाैरव हा त्याच काॅलेजमध्ये अकरावीचे शिक्षण घेत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT