Kadamba Bus Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: चालक नाहीत म्हणून ‘कदंब’च्या बससेवेवर परिणाम; 100 चालकांची लवकरच भरती, 50 इलेक्ट्रिक बसेसही दाखल; उल्‍हास तुयेकरांची माहिती

Kadamba Bus Drivers Recruitment: राज्‍यात बसचालकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्‍यामुळे अनेक मार्ग बंद करण्‍यात आले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यात बसचालकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्‍यामुळे अनेक मार्ग बंद करण्‍यात आले होते. ही समस्‍या सोडवण्‍यासाठी लवकरच महामंडळात शंभर चालकांची नेमणूक करण्‍यात येणार आहे, असे आमदार तथा ‘कदंब’ महामंडळाचे अध्‍यक्ष उल्‍हास तुयेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

काहीच दिवसांपूर्वी महामंडळाला डिझेलवर चालणाऱ्या दहा बसेस मिळाल्‍या. शिवाय २०२२ पूर्वी निविदा जारी करण्‍यात आलेल्‍या १५० इलेक्‍ट्रिक बसेसपैकी पहिल्‍या टप्‍प्‍यात ५० बसेस मिळाल्‍या. त्‍यानंतर पुन्‍हा २६ बसेस राज्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यांच्‍या नोंदणीची प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होऊन त्‍या सेवेत दाखल होतील, असे तुयेकर म्‍हणाले.

दरम्‍यान, कदंब महामंडळातून निवृत्त झालेले काही चालक इलेक्‍ट्रिक बसेस चालवत आहेत. त्‍यामुळे महामंडळाची बदनामी होत असल्‍याबाबतचा ‍प्रश्न विचारला असता, त्‍याबाबत आपल्‍याला सविस्‍तर माहिती नाही. परंतु तसे असेल तर आपण त्‍याची चौकशी करू, असेही तुयेकर यांनी सांगितले.

महिलांच्‍या मोफत प्रवासाबाबत लवकरच घेणार निर्णय

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्‍या घोषणेनुसार कामगार महिलांना कदंब बसेसचा प्रवास मोफत करण्‍याबाबतची चर्चा सरकार पातळीवर सुरू आहे. सरकार लवकरच याबाबत योग्‍य तो निर्णय घेईल, असे उल्‍हास तुयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT