double ticket fare Goa Kadamba Dainik Gomantak
गोवा

Goa Kadamba: पणजीत कदंबचा 'स्मार्ट गोंधळ' तिकिटाचे दुप्पट पैसे घेतल्याने प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद

Kadamba ticket fare issue: प्रवाशांचा प्रवास आणखीन सोयीस्कर व्हावा म्हणून या स्मार्ट सिटी पणजी येथे कदंब महामंडळाकडून ही सेवा सुरु करण्यात आलीये

Akshata Chhatre

पणजी: राजधानी पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या बसेसची ये-जा सुरु असते, प्रवाशांचा प्रवास आणखीन सोयीस्कर व्हावा म्हणून या स्मार्ट सिटी पणजी येथे कदंब महामंडळाकडून ही सेवा सुरु करण्यात आलीये. गुरुवारी (दि. २४) सकाळीच्यावेळी अशाच एका स्मार्ट सिटीच्या बसमध्ये प्रवासी आणि बस कंडक्टर त्यांच्यामध्ये तिकिटाचे पैसे वाढवल्याने शाब्दिक देवाणघेवाण झाली, अचानक तिकिटाचे पैसे दुप्पट दराने वाढवल्याने प्रवासी नाराज झालेत.

पणजी शहरात पर्यटन भवन ते कंपाल मैदानापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांनी तिकिटाचे पैसे वाढवल्याचा दावा केलाय. बसमध्ये चढताना कंडक्टरने हा रस्ता बदलला असल्याची माहिती दिली होती, मात्र पैसे देखील वाढले असल्याचं सांगितलं नव्हतं असं म्हणत त्यांनी कंडक्टरला धारेवर धरायला सुरुवात केली. सोबतच रास्ता बदलल्याचं सांगत केवळ पणजीच्या बस स्टॅन्डला चक्कर टाकून तिकिटाचे पैसे मात्र दुप्पट केल्याचा दावा करत प्रवाशांनी कंडक्टरवर प्रश्नांचा भडीमार केलाय.

स्मार्ट सिटीचा कंडक्टर मात्र दिलेल्या आदेशाचं पालन करत असल्याचं सांगतोय. कदंब महामंडळाकडून स्मार्ट सिटीच्या सर्व बसेसना हा नवीन मार्ग वापरण्याचा आदेश देण्यात आलाय आणि त्याप्रमाणे बसेस या आदेशाचं पालन करताय असं म्हणत त्याने प्रवाशांना समजावण्याचा प्रयत्न केला. हा आदेश जारी करण्यात आल्यानंतर कामाचा त्याचा पहिलाच दिवस असल्याचं तो म्हणालाय, मात्र तरीही बसमध्ये चढतानाच या नवीन रूटबद्दल प्रवाशांना माहिती दिल्याचं त्याने स्पष्ट केलं.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी म्हणजेच महिन्याच्या सुरुवातील पर्यटन भवन पणजी ते कंपाल मैदानापर्यंत केवळ ९ रुपये तिकिटाचा खर्च आकारला जायचा

ज्यात आता दुप्पट टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून नवीन किंमत १८ रुपये करण्यात आलीये आणि एवढा पैशांमध्ये रस्ता न बदलताना केवळ बस स्टॅन्डचं एक सर्कल काढून बसेस जात असल्याचा दावा प्रवाशांनी केलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

SCROLL FOR NEXT