कदंब बस  Dainik Gomantak
गोवा

Goa: कदंबच्या बसेस महाराष्ट्रातही सुरु...

कदंब महामंडळाच्या माहितीनुसार सध्या कर्नाटकातील 11 आणि महाराष्ट्रातील 10 मार्गावर धावण्यास सुरुवात होणार कदंबच्या बसेस; महामंडळाची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना (covid 19 )महामारीच्या संकटानंतर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कदंब महामंडळाच्या आंतरराज्य बसेस (Bus)बंद होत्या. त्यानंतर कर्नाटकात(Karnataka) व गोव्यात कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कर्नाटकातील बसेस सुरु केल्या गेल्या. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वरील दोन्ही राज्यातील विविध ठिकाणी ये जा करणाऱ्या कदंबच्या बसेस सुरु केल्या नव्हत्या. त्या आता हळू हळू सुरु होत आहेत. कदंब महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कर्नाटकातील 11 मार्गावर व महाराष्ट्रातील (maharashtra)10 मार्गावर कदंबच्या बसेस धावत आहेत.

वास्को, मडगाव व पणजी (panji )येथील बसस्थानकातून हा बसेस विविध शहराकडे ये जा करतात. महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेस पुणे, बोरीवली, कोल्हापूर- पंढारपूर- सोलापूर, वेंगुर्ला ,सावंतवाडी, घोटगेवाडी या मार्गावरील सर्व बसेस सुरु झाल्या आहेत. तर कर्नाटकातील बेळगाव, मुद्देहाळ लोकापूर, बदामी, गुलबर्गा, विजापूर, बंगळुरु, कारवार, या शहरात (city)बसेस सुरु झाल्या. हैद्राबाद येथे जाणारी कदंबची बसही सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

Digital Movement: फक्त 'विरोध' आहे, 'पर्याय' नाही! डिजिटल विश्वातील उपरोधिक चळवळी का ठरताहेत पोकळ?

VIDEO: 97 रन्सवर विकेट गेली अन्...; वैभव सूर्यवंशीचा संयम सुटला; मैदानातच दिली शिवी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT