Saligao Dump  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Corporation: तोट्यात चालणाऱ्या 'KTC'ला सावरण्याचा प्रयत्न निष्फळ, ऊर्जा विकास यंत्रणेच्या 'त्या' सल्ल्याकडे महामंडळाचा कानाडोळा

साळगाव प्रकल्पात वाया जातोय गॅस

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Corporation तोट्यात चालणाऱ्या कदंब वाहतूक महामंडळाला प्रवासी वाहतूक स्वस्तात करता यावी, यासाठी गोवा ऊर्जा विकास यंत्रणेने बायोगॅसवर बस चालवण्याचा सल्ला महामंडळाला दिला आहे.

मात्र, महामंडळाने या सल्ल्याकडे काणाडोळा करत विजेवर चालणाऱ्या बसेस घेण्याकडे कल ठेवला आहे.

त्यामुळे साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात निर्माण होणारा बायोगॅस अनाठायी जाळला जात असल्याने तो वापरात आणण्यासाठी यंत्रणेची धडपड सुरू आहे.

या यंत्रणेने बायोगॅसवर बस चालवण्यासाठी कदंबच्या डिझेलवरील एका बसला बायोगॅस सयंत्र जोडण्यासाठी पाच लाख रुपये खर्च केले आहेत. ती बस कदंबने चालवून पाहावी आणि आणखी काही बसेस बायोगॅस वापरासाठी परावर्तीत कराव्यात, अशी या यंत्रणेची इच्छा आहे.

हे सारे करण्यासाठी साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात बायोगॅस साठवून तो सिलींडरच्या माध्यमातून वाहून नेण्यासाठी यंत्रणा उभारावी, यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे प्रस्तावही सादर केला आहे.

...तर ३०० बसेस बायोगॅसवर

बायोगॅसवर चालवण्यात येणाऱ्या बसला किलोमीटरमागे केवळ २ रुपये ७२ पैसे इंधनासाठी खर्च येणार आहे. यामुळे एक बस दिवसाला २०० ते २२५ किमी चालली तरी बसमागे ६०० रुपयांची बचत होणार आहे.

१० रुपये किलो या सवलतीच्या दरात वायू पुरवण्याची तयारी यंत्रणेने कदंबला दर्शवली आहे. पाच वर्षांत कदंबच्या ३०० बसेस बायोगॅसवर चालवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

दरम्यान, गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर म्हणाले की, साळगाव कचरा प्रकल्पात दररोज १८ ते २१ घनमीटर वायूनिर्मिती होते. त्याच्या वापरासाठी खासगी-सार्वजनिक भागीदारीतून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे.

सीएनजी, एलएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल इंधनाच्या बसच्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या बसेस आरामदायी व टिकावू आहेत. आता ग्रामीण भागातही विजेवरील बसेस चालवण्यात येणार आहेत. - संजय घाटे, सरव्यवस्थापक, कदंब महामंडळ.

तासाला १,१२५ घनमीटर वायूनिर्मिती

एक टन ओल्या कचऱ्यापासून १५० घनमीटर बायोगॅस तयार होतो. १८० टन कचऱा प्रक्रिया केल्यावर २७ हजार घनमीटर वायू तयार होतो. म्हणजे दर तासाला साळगाव प्रकल्पात १ हजार १२५ घनमीटर वायू तयार होतो, असे गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे म्हणणे आहे.

तो वापरात आणावा यासाठी त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला आहे. सध्या या वायूवर जनित्रे चालवून वीज तयार केली जाते. तरीही उर्वरित वायू जाळून टाकण्याची वेळ येते.

वायूवर वाहने चालवण्याचे उद्दिष्ट : राज्यात प्रत्येक 10 हजार व्यक्तींमागे 946 वाहने असल्याची सांख्यिकी खात्याची आकडेवारी सांगते.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या गाड्या वायूवर चालवण्यास प्रोत्साहन देण्याचे गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे धोरण आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्याची सूचना केंद्र सरकारनेही केल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT