Jasmine Farming Mhardol Dainik Gomantak
गोवा

Mhardol Jasmine Farming: फुलं कोमेजली, रोजगार हिरावला! म्हार्दोळातली जाईशेती उद्ध्वस्त करण्यामागे बिल्डर लॉबीचा हात?

Mhardol Jasmine Farming: जाईच्या बागायतींची जमीन गिळंकृत करण्याचा बिल्डर लॉबीचा डाव : रिव्हॉल्युशनरी गोवन्स, फुल उत्पादकांचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Mhardol Jasmine Farming:म्हार्दोळ येथील अनेक फुल उत्पादकांचे पारंपरिक जायांच्या फुलांचे मळे बिल्डर्स लॉबी उद्ध्वस्त करू पाहात असून ते ही जमीन गिळंकृत करू पाहात असल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स आणि फूल उत्पादकांनी पत्रकार परिषदेत केला.

काही दिवसांपूर्वी म्हार्दोळ येथे जायांच्या मळ्याला आग लागून मोठे नुकसान झाले होते.

या प्रकाराला सर्वस्वी बिल्डर लॉबी कारणीभूत असून ते लोक फुलमळ्यांची जमीन हडप करण्याच्या बेतात असल्याचा दावा फूल उत्पादक आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या सदस्यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे सदस्य शैलेश नाईक म्हणाले की, भाजपचे डबल इंजिन सरकार हे बहुजन समाजाचे विषय तडीस नेण्यास असमर्थ ठरले आहे.

बहुजन समाजाच्या मताधिक्यावर निवडून आलेले रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुदिन ढवळीकर हे या विषयावर मूळ गिळून गप्प आहेत. केवळ रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर हे बहुजनांचे विषय अधिवेशनात मांडताना दिसतात, असे नाईक म्हणाले.

गौरेश गावडे म्हणाले की, जायांची जत्रा ही नावाजलेली जत्रा असून पिढ्यान पिढ्या फुलवाले समाज जायांची फुले विकत आहेत. पण अलीकडे जायांच्या मळ्यांना आग लागण्याचे प्रकार वाढत आहे. नक्कीच यामागे बिल्डर्स लॉबीचा हात आहे.

आमदारांकडून निवडणुकीपुरताच मतदारांचा वापर

म्हार्दोळचे ग्रामस्थ रूपो जल्मी यांनी याप्रश्‍नी स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आमदार गावडे हे फुलकार म्हणजेच बहुजन समाजाचा केवळ निवडणुकीवेळीच वापर करतात.

परंतु जेव्हा त्यांना हक्क देण्याची वेळ येते, तेव्हा ते अपयशी ठरतात. खरे तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत निवडून येताच कष्टकरी समाजाचे प्रश्न मार्गी लावायला हवे होते, परंतु तसे झालेे नाही.

...तर ६० कुटुंबे रस्त्यावर येतील :

म्हार्दोळ येथे फुलकार समाजाची 60 कुटुंबे या जाई बागायतीच्या आधाराने संसाराचा गाडा चालवत आहेत.

परंतु रसायने टाकून, आग लावून जाईच्या बागायती नष्ट करण्याच्या घटना म्हणजे आमचा संसार उघड्यावर पाडण्याचे षडयंत्र आहे. तसे झाल्यास 60 कुटुंबे रस्त्यावर येतील, अशी भीती फुलकार समाजाचे ज्येष्ठ नागरिक रमेश नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT