Goa News | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant Statement: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अग्रेसर कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;आयटी कंपन्यांची पसंती

Pramod Sawant: आयआयटीएफ : राज्यात मोठी गुंतवणूक अपेक्षित

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: नवी दिल्लीतील भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील गोव्याच्या दालनास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध अग्रेसर कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कंपन्यांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आगामी काळात राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा करण्यात येत आहे.

गोव्याच्या या दालनास राज्याचे पर्यटन तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी भेट देऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. खंवटे यांनी गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आखत असलेल्या राज्य सरकारच्या योजनांची कंपन्यांना माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी व्यापार मेळाव्यात गोवा दालनाला भेट दिली. माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे सिद्धेश सामंत यांनी त्यांचे दालनात स्वागत केले.

गोवा पर्यटनासाठी प्रसिध्द असल्यामुळे देशविदेशातील पर्यटक राज्याला भेटी देत असून त्यांना आपल्या सुट्टीकालीन दिवसांतही आभासी पध्दतीने काम करता यावे यासाठी सरकारच्या संकल्पनांची जाणीव खंवटे यांनी कंपन्यांना दिली.

राज्यात आयटी उद्योगाला उज्ज्वल भवितव्य असल्याचेही खंवटे यांनी या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अवगत केले. मंत्री खंवटेसोबत पर्यटन सचिव संजीव आहुजा व पर्यटन संचालक निखिल देसाई देखील उपस्थित होते.

सांस्कृतिक सादरीकरणाला गर्दी

उद्या या मेळ्याचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रात गोव्याच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे सादरीकरण होत असून हा कार्यक्रमही गर्दी खेचत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT