Govind Gaude: विद्यार्थ्यांनी आपले हक्क व अधिकार काय हे जाणून घ्यावे ;व्यावहारिक ज्ञानही मिळवावे

Govind Gaude: चौथ्या आदिवासी विद्यार्थी संमेलनाचे उद्‌घाटन
Govind Gaude |Goa News
Govind Gaude |Goa News Dainik Gomantak

विद्यार्थ्यांनी केवळ घोकमपट्टी न करता व्यावहारीक ज्ञान मिळविण्यावरही भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपले हक्क व अधिकार काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्ज्वल करता येईल, कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य अंगी बाणवता येईल,असे मत कला व संस्कृती तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.

आदिवासी कल्याण संचालनालयाने ‘उटा’ च्या सहकार्याने आयोजित केलेल्या चौथ्या आदिवासी विद्यार्थी संमेलनाचे उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते. रवींद्र भवन मडगाव मध्ये आयोजित या संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यास कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, एसटी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमलकर तसेच मार्गदर्शक डॉ. अरूण भारद्वाज व नागेश सरदेसाई व आदिवासी कल्याण संचालिका त्रिवेणी वेळीप उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यानी केवळ पुस्तकी अभ्यासावर लक्ष केंद्रीत न करता आपले अंगभूत कौशल्य जाणून त्याचा विकास करण्यावर भर द्यावा. दुसऱ्यांचे विचार केवळ सल्ला मानून त्याचे पालन करावे की न करावे हे ठरवावे, असा सल्लाही मंत्री गावडे यांनी या प्रसंगी दिला.

वासुदेव मेंग गावकर व प्रकाश वेळीप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्रिवेणी वेळीप यांनी स्वागत केले. या प्रसंगी आदिवासी कल्याण संचालनालयाने तयार केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक योजना ऑनलाईन पोर्टलवर घालण्यात आल्या.

या प्रसंगी मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दुर्गेश गावकर यांचा सन्मान करण्यात आला. दहावी, बारावीत चांगले गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

त्यानंतर डॉ. अरुण भट्टाचार्य व नागेश सरदेसाई यांनी कारकिर्द यशस्वी करण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. याचा लाभ गोव्याचील 80 पैकी 55 उच्च माध्यमिक विद्यालयातील अंदाजे एक हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Govind Gaude |Goa News
Delhi Murder Case : दिल्ली हत्याकांडाचं गोवा कनेक्शन; श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबची दुसऱ्या मुलीसह गोव्यात मौजमजा

23,336 आदिवासी विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ !

या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले, की केंद्र व राज्य सरकारच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आहेत. गोव्यात या योजनांचा लाभ 23,336 आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमावर भर द्यावा,असेही आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com