Goa Drugs Cartel Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Cartel: रशियाच्या ऑलिम्पिक पदक विजेतीने गोव्यात असं तयार केलं होतं जाळं

कोण आहे ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेली स्वेतलाना वर्गानोव्हा? घ्या जाणून...

Akshay Nirmale

Who is Svetlana Varganova arrested in Goa International Drug Cartel

गोवा आणि रशियन नागरिक, रशियन पर्यटकांचे वेगळे नाते गेल्या अनेक वर्षात निर्माण झाले आहेत. त्यामुळे गोवा हे रशियन्ससाठी दुसरे घर आहे, असे म्हटले तर अतिषयोक्ती ठरू नये. अनेक रशियन्स गोव्यात सनबाथसाठी, गोवा फिरण्यासाठी नियमित येत असतात.

गोव्यातील अनेक समुद्र किनाऱ्यांवर वर्षभर रशियन्सचा वावर असतो. अर्थात यातील काहींचा सहभाग गोव्यातील ड्रग्ज कार्टेलमध्ये असल्याचेही अलीकडच्या काळात वारंवार समोर आले आहे. त्यातीलच नवे आणि धक्कादायक नाव शनिवारी समोर आले आहे.

शनिवारी गोव्यातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या गोवा युनिटने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल्सच्या विरोधात मोठी कारवाई करताना एका रशियन महिला जलतरणपटूला ताब्यात घेतले आहे.

कोण आहे स्वेतलाना?

एनसीबीने अटक केलेल्या खेळाडूचे नाव स्वेतलाना वर्गानोव्हा असे आहे. ती जलतरणपटू असून रशियासाठी तिने जलतरण स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. 1980 च्या समर ऑलिंपिक स्पर्धेत तिने जलतरणात रौप्यपदक पटकावले होते. तिने 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले होते. तेव्हा तिने 2:29.61 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. तिचा जन्म 19 नोव्हेंबर 1964 रोजी झाला आहे. वर्गानोव्हा हीने काही काळ रशियाच्या पोलिस दलातही काम केल्याचे सांगितले जाते.

कोण आहे आंद्रे?

आंद्रे हा देखील रशियाचा असून तो रशियातील निवृत्त पोलीस कर्मचारी असल्याचे समजते.

गोव्यात या टोळीची अशी होती मोडस ऑपरेंडी?

आंद्रे हा गोव्यात यायचा. त्याने गोव्यातील विविध भागांमध्ये फिरुन स्वत: चे नेटवर्क तयार केले. गोव्यातील स्ट्रीट पेडलर त्याच्या संपर्कात असायचे. स्वेतलाना आणि आकाश हे दोघेही आंद्रेसाठी काम करायचे. स्वेतलाना ही फक्त परदेशी पर्यटकांच्या संपर्कात असायची. परदेशी पर्यटकांना अमलीपदार्थ विकण्याचं काम स्वेतलानाकडे होतं. तर आकाश हा स्थानिकांच्या संपर्कात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT