Goa Airport
Goa Airport  Dainik Gomantak
गोवा

गोवा विमानतळावर लवकरच पार्किंगची सुविधा मिळणार

आदित्य जोशी

पणजी : दाबोळीतील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पार्किंगची सुविधा वाहनचालकांना मिळणार आहे. विमानतळ संचालक एस व्ही टी धनंजय राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या विमानतळावर पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनचालकांना पर्यायी वाहनांचा वापर करावा लागतो. तसंच विमानतळाबाहेर दूर गाड्यांचं पार्किंग करावं लागतं. यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

राव यांनी नुकताच गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुत्रं हातात घेतली आहेत. राव यांच्या म्हणण्यानुसार या पार्किंग सुविधेसाठी आधी काही अभ्यास करावा लागणार आहे. यानंतरच पार्किंगच्या सुविधेचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र काहीही झालं तरी लवकरात लवकर पार्किंग सुविधा सर्वसामान्यांसाठी कार्यरत करण्याचे प्रयत्न असल्याचंही राव यांनी स्पष्ट केलं आहे.

गोवा विमानतळाचे माजी संचालक गगन मलिक यांनी यासाठी लागणाऱ्या परवानग्या यापूर्वीच मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच ही पार्किंग सुविधा मे 2022 पर्यंत कार्यान्वित होणं अपेक्षित असल्याचंही सांगितलं होतं. मात्र मलिक यांची पदोन्नतीवर गोव्याबाहेर बदली झाल्याने हे काम रखडलं होतं. पार्किंगच्या इमारतीचं काम मागच्याच वर्षी पूर्ण झालं असून काही सुरक्षेच्या कारणांमुळे सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम थांबलं होतं. यातच कोरोना लॉकडाऊनमुळेही कामावर परिणाम झाला होता. या पार्किंग सुविधेमुळे विमानतळावरील पार्किंग आणि ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

Loksabha Election Voting : वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी मतदानाची व्यवस्था करा; शॅडो कौन्सिलची मागणी

Panaji News : कामे केल्यानेच भाऊंवर मतदारांचा विश्‍वास : रुडाॅल्फ फर्नांडिस

Mandrem News : मांद्रेतील राजकारणाला भाजपकडून अकस्मात कलाटणी; सचिन परब ठोकणार काँग्रेसला रामराम

Crime News : बोरीत अभियंता घरीच करायचा गांजाची लागवड; पोलिसांकडून अटक : ८.५० लाखांचे ड्रग्स जप्त

SCROLL FOR NEXT