‘
Panaji : अनघा वाचासुंदर प्रतिष्ठानतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. ८ जुलै रोजी सकाळी १० वा. पहिली व दुसरीतील मुलांसाठी बालगीत स्पर्धा, तर तिसरी व चौथीतील मुलांसाठी दुपारी ३ वा. संत कथा स्पर्धा घेण्यात येईल.
९ रोजी सकाळी १० वा. पाचवी व सहावीसाठी वैज्ञानिकांच्या कथा स्पर्धा, तर सातवी व आठवीसाठी ३ वा. नाट्यछटा स्पर्धा होतील. १० रोजी ३ वा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धा होईल. १५ रोजी सकाळी ९.३० वा. नववीसाठी प्रज्ञावंत विद्यार्थिनी स्पर्धा होईल. १६ रोजी सकाळी १० वा. नववी व दहावीसाठी वक्तृत्व स्पर्धा, तर दु. ३ वा. अकरावी व बारावीचे विद्यार्थी/शिक्षक यांच्यासाठी कविता सादरीकरण स्पर्धा होईल.
१९ रोजी दु. ३ वा. बीएड विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन तर २० रोजी दुपारी ३ वा. डीएड विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य स्पर्धा होईल. बीएड व डीएडच्या स्पर्धा एल. डी. मेमोरियल हायस्कूल, विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुल, पर्वरी येथे होतील, तर उर्वरित स्पर्धा अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान, प्लॉट १३, पीडीए कॉलनी, पर्वरी येथे होतील. स्पर्धकांनी सोबत विद्यालयाचे पत्र आणणे आवश्यक आहे. पथनाट्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेतून जास्तीत जास्त चार पथके पाठवता येतील.
२३ रोजी पारितोषिक वितरण
कविता सादरीकरणासाठी प्रत्येकी दोन आणि इतर स्पर्धांसाठी प्रत्येक गटासाठी शाळेतर्फे एक स्पर्धक पाठवता येईल. इच्छुकांनी किमान दोन दिवस अगोदर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. २३ जुलै रोजी संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रेया वाचासुंदर यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरिता ९६२३७०१०२० या क्रमांकावर संपर्क साधावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.