Vande Bharat Express: तिकीट महाग तरीही उत्स्फूर्त प्रतिसाद

मडगाव - मुंबई प्रवास: तिकीट महाग असूनही 50 टक्के जागा फुल्ल!
Mumbai-Goa Vande Bharat Express
Mumbai-Goa Vande Bharat Express Dainik Gomantak
Published on
Updated on

Vande Bharat Express ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या सेमी स्पीड रेल्वेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी मुंबईहून मडगावात आलेल्या गाडीतील 80 टक्के आसने, तर गुरुवारी मडगाव ते मुंबईला गेलेल्या ‘वंदे भारत’मधील 50 टक्के जागा फुल्ल झाल्या होत्या.

‘वंदे भारत एक्सप्रेस’ या रेल्वेच्या चेअर कारचे तिकीट 1970 रुपये असून एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट हे 3535 एवढे आहे. विमानाचे तत्काळ तिकीटही साधारण 3500 च्या आसपास जाते. त्यामुळे गाडीला प्रवाशांच्या प्रतिसाद मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Mapusa Municipality: म्हापशात सोपो घोटाळ्याचा आरोप

या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता, त्यांनी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली.

बुधवारी मुंबई येथून गोव्याला आलेल्या गाडीतील एकूण ५०० जागांपैकी ८० टक्के फुल्ल होत्या, तर गुरुवारी मडगाव येथून मुंबईला गेलेल्या वंदे भारतच्या ५० टक्के जागा फुल्ल होत्या, असे स्पष्ट केले.

सर्व आसने प्रतीक्षा यादीत

वंदे भारत रेल्वे मॉन्सून कालावधीत आठवड्यातून तीन दिवस प्रवास करणार आहे. १५ ऑगस्ट रोजीच्या गाडीची तिकिटे आरक्षित झाली असून चेअर कारमध्ये १३६, तर एक्झिक्युटिव्ह कारमध्ये ४८ वेटिंग लिस्ट आहे.

गणेशोत्सवात २३ सप्टेंबर रोजी ९३ व २६ सप्टेंबर रोजी ८७ वेटिंग लिस्ट आहे. मुंबईवरून येणाऱ्या वंदे भारत गाड्याही गणेशोत्सव काळात फुल्ल झाल्या.

१५ सप्टेंबरला १२९, १८ सप्टेंबर रोजी ३८ व २० सप्टेंबर रोजी १२ वेटिंग लिस्ट आहे. केवळ खुर्ची यानच नाही, तर एक्झिक्युटिव्ह कारमधील जागाही प्रतीक्षा यादीवर आहे.

Mumbai-Goa Vande Bharat Express
Sudin Dhavalikar: वीज निर्मितीत गोवा लवकरच आत्मनिर्भर

गणेशोत्सवातील तिकीटेही आरक्षित

वंदे भारत गाडीच्या तिकिटावर लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी दुसऱ्या रेल्वेना प्राधान्य देतील असे म्हटले जात होते. मात्र, वंदे भारत गाडीचे आरक्षण खुले होताच गणेशोत्सवातील बुकिंगही फुल्ल झालेले आहे.

या कालावधीतील तिकिटांसाठी प्रवासी वेटिंगवर आहेत, हे विशेष असून तिकिटाची पर्वा न करता चांगल्या सेवेमुळे प्रवासी प्रतिसाद देत असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com